Home क्राईम संगमनेरात महिलांमध्ये भीतीचे वातावरण, नेमके कारण काय?

संगमनेरात महिलांमध्ये भीतीचे वातावरण, नेमके कारण काय?

Sangamner Crime: संगमनेर बसस्थानकावर साडेतीन तोळे सोन्याच्या दागिन्यांची चोरी.

Three and a half tola gold ornaments theft at Sangamner bus stand

संगमनेर: संगमनेर बस स्थानकात महिलेच्या पर्समधून चोरी झाल्याच्या घटना अनेकदा घडल्या आहेत. अशातच आणखी एक घटना घडल्याने संगमनेरातील महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बस स्थानक परिसरात पोलीस चौकी स्थापित करण्यात आली असून देखील यंत्रणा कुचकामी ठरत असल्याचे समोर येत आहे. चोरट्यांना कायद्याचा धाक राहिला की नाही असा सवाल उपस्थित होत आहे. एसटी बसमध्ये चढत असताना अज्ञात चोरट्याने गर्दीचा फायदा घेत महिलेच्या पर्समधील साडेतीन तोळे सोन्याचे दागिने लांबविल्याची घटना संगमनेर येथील बसस्थानकात शुक्रवार दि. १ सप्टेंबर रोजी भरदुपारी एक वाजेच्या सुमारास घडली. त्यामुळे महिलांमध्ये भीतीच वातावरण निर्माण झाले आहे.

याबाबत शहर पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, उज्वला धनराज वाकचौरे ह महिला अकोले तालुक्यातील कळस येथील राहणार आहे. त मंगळवार दि. २९ ऑगस्ट रोजी रक्षाबंधनासाठी संगमनेर तालुक्यातील कोळवाडे येथे आली होती. या महिलेने तीन तोळे सोन्याचे गंठण व चार ग्रॅम कानातील झुमके हे सर्व दागिने डबीमध्ये ठेवून डब्बी पर्समध्ये ठेवली होती. शुक्रवारी उज्वल या सासरी जाण्यासाठी संगमनेर बसस्थानकात आल्या होत्या. दुपारी एक वाजेच्या सुमारास संगमनेर – अकोले बसमध्ये चढत असताना अज्ञात चोरटे गर्दीचा फायदा घेत पर्सची चैन उघडून दागिने चोरून पसार झाले आहे. याप्रकरणी उज्वला वाकचौरे या महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलिस नाईक बंडू टोपे हे करत आहे. दरम्यान सातत्याने घडत असलेल्या चोरीच्या घटना घडत असल्याने महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

Web Title: Three and a half tola gold ornaments theft at Sangamner bus stand

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here