Home अहमदनगर अहमदनगर: मुलीस पळविणाऱ्या शाळेच्या बसचालकास अटक

अहमदनगर: मुलीस पळविणाऱ्या शाळेच्या बसचालकास अटक

Ahmednagar News:  अल्पवयीन मुलीस फूस लावून आमिष दाखवित पळवून ( abducting girl) नेल्याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलिसांनी देवळाली येथील एका शाळेच्या बसचालकास अटक (Arrested).

School bus driver arrested for abducting girl

श्रीरामपूर | Shrirampur: अल्पवयीन मुलीस फूस लावून आमिष दाखवित पळवून नेल्याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलिसांनी देवळाली येथील एका शाळेच्या बसचालकास अटक केली आहे.

गेल्या आठवड्यात अल्पवयीन मुलीस राहत्या घरातून पळवून नेल्याप्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी एक पथक नेमले. तपास पथकाने आरोपी व अल्पवयीन मुलीचा शोध घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले. पोलिस आपल्या मागावर असल्याची चाहूल आरोपीस लागली होती. आरोपी मुलीस १० जून रोजी सायंकाळी राहुरी फॅक्टरी येथे सोडून निघून गेला. अल्पवयीन मुलीस विश्वासात घेऊन पोलिसांनी विचारपूस केली असता तिच्या शाळेचा बसचालक आरोपी विजय गोविंद गोडसे (रा. देवळाली) असे असून त्याने माझे तुझ्यावर प्रेम आहे. तुला आई- वडील त्रास देतात. आपण त्यांच्यापासून दूर निघून जाऊ असे म्हणत राहत्या घरातून घेऊन गेला असा जबाब पीडित मुलीने दिला आहे.

दि. १६ जून रोजी आरोपी गोडसे राहुरी फॅक्टरी येथे येणार असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून आरोपीस अटक केली.

Web Title: School bus driver arrested for abducting girl

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here