Home अहमदनगर अहमदनगर: पोहण्यासाठी गेलेल्या युवकाचा मृत्यू

अहमदनगर: पोहण्यासाठी गेलेल्या युवकाचा मृत्यू

Ahmednagar News: मित्रांसमवेत मुळा धरणाच्या उजव्या कालव्यात पोहण्यासाठी गेलेल्या युवकाचा पाण्यात बुडून (Drowned) दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना.

Death of a youth who went swimming Drowned

राहुरी | Rahuri: मित्रांसमवेत मुळा धरणाच्या उजव्या कालव्यात पोहण्यासाठी गेलेल्या आकाश दगडू पवार या युवकाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवार (दि. १६) दुपारी १ च्या सुमारास घडली.

मित्रांसमवेत आकाश पवार (वय २२) हा मुळा धरणाच्या पायथ्याशी उजव्या कालव्यालगत पोहण्यासाठी गेला होता. त्याने पोहण्यासाठी पाण्यात उडी घेतली. पोहोत असतानाच तो गटांगळ्या घेऊ लागला. मित्रांनी आरडाओरडा केला. परंतु काही क्षणातच तो पाण्यात दिसेनासा झाला. घटनेची माहिती समजताच जिल्हा परिषद सदस्य धनराज गाडे व जिल्हा नियोजन समितीचे सदस्य प्रभाकर गाडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रसंगी पाणबुड्यांनी पाण्यात उड्या घेत आकाशचा शोध सुरू केला. सुमारे ५ तासाच्या अथक परिश्रमानंतर आकाशचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला. या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.

Web Title: Death of a youth who went swimming Drowned

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here