Home राहाता विखे पाटील, थोरात – कोल्हे यांची प्रतिष्ठा पणाला,  गणेशसाठी ८९ टक्के मतदान

विखे पाटील, थोरात – कोल्हे यांची प्रतिष्ठा पणाला,  गणेशसाठी ८९ टक्के मतदान

Rahata Ganesh Karkhana Election: गणेश सहकारी साखर कारखाना निवडणुकीत चुरसीने ८९ टक्के मतदान झाले, निकालाकडे नजरा, सोमवारी होणार फैसला.

Rahata Ganesh Karkhana Election

राहाता:  गणेश सहकारी साखर कारखाना निवडणुकीत चुरसीने ८९ टक्के मतदान झाले. ही निवडणूक राजकीयदृष्ट्या अत्यंत प्रतिष्ठेची झाली. त्यामुळे गणेशच्या निकालाकडे जिल्ह्याचेच नव्हे तर राज्याचे लक्ष लागून आहे. सत्ताधारी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधात आमदार बाळासाहेब थोरात व विवेक कोल्हे यांनी दंड थोपटल्याने सोमवारी राहाता तहसील कार्यालयात मतमोजणी होणार आहे.

विखे गट व थोरात-कोल्हे गटाने विजयाचे दावे केले आहेत. गणेशच्या निवडणुकीचे मैदान विधानसभेचे कुरुक्षेत्र बनल्याचे दिसत होते. या निवडणुकीच्या रणभूमीवर कोण बाजी मारणार, हे उद्या सोमवारी मतमोजणीनंतर स्पष्ट होणार आहे. दरम्यान, वाढलेले मतदान चर्चेचा विषय आहे.

गणेश सहकारी साखर कारखाना निवडणुकीसाठी शनिवार (दि. १७) मतदान पार पडले. या निवडणुकीसाठी ८ हजार २३४ मतदार संख्या होती. त्यापैकी ७ हजार ३३५ उमेदवारांनी आपला मतदानाचा हक्क बजावल्याने सरासरी ८९ टक्के मतदान झाले. राहाता येथील जिल्हा परिषद शाळेत मतदारांच्या मतदानासाठी रांगा लागलेल्या होत्या.

सकाळपासूनच मतदान केंद्रावर सभासदांनी मतदानासाठी मोठा उत्साह दाखवला. जास्तीत जास्त मतदान होण्यासाठी सर्वच पॅनलचे प्रमुख कार्यकर्ते पदाधिकारी विशेष काळजी घेताना दिसत होते. वयस्कर मतदार उत्सुकतेने येऊन आपला हक्क निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून बजावताना दिसले. सकाळी सुरू झालेल्या मतदानाची आकडेवारी टप्प्याटप्प्याने वाढत गेली. सायंकाळी पाच वाजेपर्यंत मतदान संपेपर्यंत दोन्ही गटाचे कार्यकर्ते मतदान केंद्राबाहेर विजयाचे दावे प्रति दावे करून एकमेकांचे विजय व पराज्याचे गणित मांडताना दिसत होते. मतदारसंघातील गटानुसार मतदान

१) शिर्डी- एकूण मतदार १ हजार ६३२ पैकी १ हजार ४४६ (८८.६० टक्के)

२) राहाता १ हजार ७२२ मतदार आहेत. पैकी १ हजार ५७२ (९१.२९ टक्के)

३] अस्तगाव १ हजार ४५५ मतदार पैकी १ हजार २७२ (८७.४२ टक्के]

४) वाकडी – १ हजार ६२३ मतदार पैकी १ हजार ३९६ (८६.०१ टक्के)

५] पुणतांबा- १ हजार ७२७ मतदार पैकी १ हजार ५७४ (९१.१४ टक्के

६) ब वर्ग मतदारसंघात ७५ मतदान होते पैकी सर्वच्या सर्व ७५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावल्याने (१०० टक्के) मतदान झाले.

या निवडणुकीचा निकाल काय लागतो याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.  लागले आहे.

Web Title: Rahata Ganesh Karkhana Election

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here