Home अहमदनगर धक्कादायक: अहमदनगर जिल्ह्यातील या शाळेत १६ विद्यार्थी व ३ शिक्षकांना कोरोनाची लागण

धक्कादायक: अहमदनगर जिल्ह्यातील या शाळेत १६ विद्यार्थी व ३ शिक्षकांना कोरोनाची लागण

school in Ahmednagar News Today 16 students and 3 teachers were infected with corona 

अहमदनगर | Ahmednagar News Today: पारनेर (Parner) तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील जवाहर नवोदय विद्यालयातील १६ विदयार्थी आणि ३ शिक्षकांना कोरोनाची लागण झाली असल्याचे समोर आले आहे. त्यांची प्रकृती ठणठणीत असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. इतर विद्यार्थ्यांची तपासणी सुरु आहे.  अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश लाळगे यांनी दिली.

टाकळी ढोकेश्वरच्या नवोदय विद्यालयात राज्यभरातून ४०६ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यातील काहींना सर्दी खोकल्याचा त्रास सुरू झाल्याने त्यांची चाचणी करण्यात आली. सायंकाळपर्यंत १६ विद्यार्थी आणि ३ शिक्षकांना करोनाची लागण झाल्याचे आढळून आले. इतरांची तपासणी सुरू होती. हे विद्यार्थी सहावी ते बारावी या वर्गातील आहेत. तेथील वसतिगृहात ते राहतात.

या अगोदरही पाथर्डी तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत सात विद्यार्थ्यांना करोनाची लागण झाल्याचे आढळून आले होते.

Web Title: school in Ahmednagar News Today 16 students and 3 teachers were infected with corona 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here