संगमनेर तालुक्यातील घटना: आईच्या मित्रानेच केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग
संगमनेर | Crime News: पतीशी वाद झाल्याने एक महिला १६ वर्षीय मुलीसह ४७ वर्ष वयाच्या व्यक्तीसोबत वास्तव्यास आहे. संबंधित व्यक्तीने या अल्पवयीन मुलीशी लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. त्यानंतर हा प्रकार आईस सांगितला असता तिने याची वाच्यता न करण्याचे सांगितले. मात्र वारंवार होत असलेला हा प्रकार सहन न झाल्याने अखेर तिच्या वडिलांना या प्रकारची कल्पना दिल्याने त्यानंतर पिडीतीने संगमनेर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून आई व त्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शहरानजीक असलेल्या गुंजाळवाडी परिसरात पतीशी वाद झालेली ४० वर्षीय महिला तिच्या अल्पवयीन मुलीसह बाबासाहेब बाबुराव गुंजाळ रा. गुंजाळवाडी याच्यासोबत राहत होती. ५ ऑक्टोबर २०२१ रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास मुलगी घरात एकटी असताना बाबासाहेब गुंजाळ याने मुलीला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. तिने विरोध करत त्याला खडसावले असता तिच्या बहिणीला मारण्याची धमकी त्याने दिली. हा प्रकार आपल्या आईला सांगितला असता आईने चूप राहण्यास सांगितले. हा प्रकार असह्य झाल्याने पिडीतेने आपल्या वडिलांना सांगितला. त्यानंतर संगमनेर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून आई व गुंजाळ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक निकिता महाले करीत आहे.
Web Title: Crime News Sangamner mother’s friend molested the minor girl