अहमदनगर ब्रेकिंग: शालेय विद्यार्थीनीने नदीपात्रात घेतली उडी अन घडले असे काही…
Ahmednagar News: गोदावरी नदीवरील (River) लहान पुलावरून एका शालेय विद्यार्थिनीने नदीपात्रात उडी मारली, पुलावरून जाणाऱ्या येणाऱ्यांच्या लक्षात आली अन तिचे प्राण वाचविले.
कोपरगाव: शहरातून वाहणार्या गोदावरी नदीवरील लहान पुलावरून एका शालेय विद्यार्थिनीने सोमवारी संध्याकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास नदीपात्रात उडी मारली पुलावरून जाणाऱ्या येणाऱ्यांच्या लक्षात आली आणि एकच गर्दी झाली. शहरातील आपदा मित्र असलेल्या तरुणांना ही बाब कळताच जवळच असलेले युवक दिपक थोरात, सोमनाथ आहेर, संतोष वायदंडे, संजय जगधने, किरण सिनगर, विजू मरसाळे आणि सुषमा खिलारी हे त्याठिकाणी पोहोचले. यातील काही जणांनी वाहत्या पाण्यात उडी मारून पुलापासून काही अंतरावर वाहून जात असतांना सदर मुलीला पकडले आणि पाण्याबाहेर काढत तिचे प्राण वाचवले.
दररोजच्या बातम्या मिळविण्यासाठी आमचा ग्रुप जॉईन करा. संगमनेर अकोले न्यूज
अचानक पुलावर गर्दी झाल्याने शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी सुशील शिंदे तसेच शिर्डी पोलीस स्टेशनचे कर्मचारी रामेश्वर वेताळ हे पुलावरून जात असताना ते देखील मदतीसाठी नदीपात्रात उतरले. या तरुणांच्या सतर्कतेने सदर शालेय विद्यार्थिनीचे प्राण वाचले आहे. तरुणांच्या या धाडसामुळे मुलीचे प्राण वाचल्याने नागरिकांकडून या तरुणांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
Web Title: A school student jumped into the river and something happened
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App