Home क्राईम धक्कादायक! शाळकरी मुलीची विक्री, नंतर लॉजवर नेत अत्याचार

धक्कादायक! शाळकरी मुलीची विक्री, नंतर लॉजवर नेत अत्याचार

Satara Crime: सातारा शहरात धक्कादायक घटना समोर आली आहे. आठवीत शिकणाऱ्या एका शाळकरी मुलीची चक्क साडेतीन हजार रुपयांना विक्री करून एका महिलेने तिला अनोळखी व्यक्तीच्या हवाली. नराधमाने मुलीला साताऱ्यातील एका लॉजवर नेऊन तिच्यावर बलात्कार (Rape).

Schoolgirl sold, then taken to lodge and rape

सातारा | Satara: सातारा शहराला हादरून सोडणारी घटना समोर आली आहे. आठवीत शिकणाऱ्या एका शाळकरी मुलीची चक्क साडेतीन हजार रुपयांना विक्री करून एका महिलेने तिला अनोळखी व्यक्तीच्या हवाली केले. त्या नराधमाने मुलीला साताऱ्यातील एका लॉजवर नेऊन तिच्यावर बलात्कार केला. हा धक्कादायक प्रकार तब्बल नऊ दिवसांनंतर उघडकीस आला. याप्रकरणी संबंधित महिला व अनोळखी पुरुषावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारती अमित कट्टीमणी (रा. कोडोली, सातारा) या महिलेसह एका ४० वर्षीय अनोळखी व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, पीडित मुलगी १३ वर्षांची असून, ती आठवी इयत्तेत शिकत आहे. भारती कट्टीमणी हिने पीडित मुलीला २८ एप्रिल रोजी सायंकाळी पावणेसात वाजता ‘बाहेरचे लोक येतायत. त्यांच्यासोबत फिरायला जायचे आहे,’ असं सांगितले. त्यामुळे मुलगी तिच्यासोबत फिरण्यासाठी गेली. त्यानंतर भारतीने तिला थेट साताऱ्यातील एका लॉजवर नेले. या ठिकाणी अगोदरच तेथे एक अंदाजे ४० वर्षीय अनोळखी व्यक्ती होती. त्या व्यक्तीसोबत भारतीने व्यवहार ठरवला आणि त्याच्याकडून साडेतीन हजार रुपये घेऊन तिने मुलीची विक्री केली.

नराधमाच्या ताब्यात मुलीला देऊन भारती तेथून निघून गेली. संबंधित नराधमाने त्या शाळकरी मुलीवर लॉजच्या खोलीत बलात्कार केला. या प्रकारानंतर मुलगी रडू लागल्याने तिला दमदाटी करण्यात आली. घडलेल्या प्रकाराची माहिती मुलीने आईला मोबाईलवर मेसेज करून सांगितली. त्यावेळी तिची आई बाहेरगावी होती. मेसेज पाहिल्यानंतर आईने मुलीला तत्काळ फोन केला. तेव्हा मुलगी रडू लागली. घडलेला प्रकार मुलीने रडत-रडतच तिच्या आईला सांगितला. त्यानंतर आईने तातडीने साताऱ्यात येऊन तिच्या वडिलांना या प्रकाराची माहिती दिली. मात्र, या प्रकाराची कोठे वाच्यता होऊ नये, यासाठी काहींचे प्रयत्न सुरू झाले. परंतु पीडित मुलीच्या आईने आपल्या मुलीवर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी कोणाच्याही दबावाला बळी न पडता नऊ दिवसांनंतर सातारा शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.

पोलिसांनी भारती कट्टीमणी हिच्यासह त्या अनोळखी नराधमावर मुलीची विक्री करून जबरदस्तीने बलात्कार करणे, बाल लैंगिक अत्याचार अधिनियम कलमांन्वये गुन्हा दाखल केला. पोलीस उपनिरीक्षक वाघमोडे अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Schoolgirl sold, then taken to lodge and rape

Sangamner Akole News Whats app Marketing

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here