Home क्राईम संगमनेरात विद्यार्थिनीची छेडछाड, भाजीपाला आणण्यासाठी गेली अन…

संगमनेरात विद्यार्थिनीची छेडछाड, भाजीपाला आणण्यासाठी गेली अन…

Sangamner Crime:  मैत्रिणी सोबत भाजीपाला आणण्यासाठी पायी जाणार्‍या एका विद्यार्थिनीची अज्ञात इसमाने छेडछाड केल्याची घटना, अज्ञात युवकावर गुन्हा दाखल.

Crime student's teasing at Sangamaner went to fetch vegetables

संगमनेर:  मैत्रिणी सोबत भाजीपाला आणण्यासाठी पायी जाणार्‍या एका विद्यार्थिनीची अज्ञात इसमाने छेडछाड केल्याची घटना शनिवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास अकोले बायपास जवळ घडली. अज्ञात युवकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, मूळ रहिवासी अकोले तालुक्यातील लिंगदेव परिसरात राहणारी व सध्या शिक्षणासाठी संगमनेर येथे राहत असलेली अठरा वर्षांची युवती शनिवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास आपल्या मैत्रिणीसोबत भाजीपाला आणण्यासाठी जात होती. ऐश्वर्या पेट्रोलपंपामागे मोटार सायकलवरून एक जण तेथे आला.

त्याने सदर युवतीची छेडछाड करण्याचा प्रयत्न केला. तो लगेच घटनास्थळावरून निघून गेला. याबाबत सदर युवतीने शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात युवकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल श्री. खाडे करत आहेत.

Web Title: Crime student’s teasing at Sangamaner went to fetch vegetables

Sangamner Akole News Whats app Marketing

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here