Home अहमदनगर फोटो व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार करणारा आरोपी जेरबंद

फोटो व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार करणारा आरोपी जेरबंद

Sexual abuse a  woman threatening to make photos and videos viral arrested

अहमदनगर | Ahmednagar:  फोटो व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी तसेच नवऱ्याला ठार मारण्याची धमकी देत विवाहित महिलेवर अत्याचार (Sexual  abuse ) करणार्‍या आरोपीला तोफखाना पोलिसांनी अटक केली आहे. मनोज भालचंद्र जाधव (रा. रेणुकानगर, बोल्हेगाव) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. न्यायालयासमोर हजर केले असता त्याला न्यायालयाने 29 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

आधीक माहिती अशी की, या गुन्ह्यातील फिर्यादी महिला व मनोज जाधव यांची मैत्री होती. यानंतर त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. ऑक्टोबर 2021 मध्ये मनोज याच्यासोबत फिर्यादी महिला एमआयडीसी येथील साईबन येथे गेल्यानंतर फिर्यादी महिला पाणी पिल्याने तिला झोप आली. यानंतर मनोज याने तिच्यासोबत संबंध केले. ही गोष्ट कोणाला सांगितली तर नवर्‍याला ठार मारण्याची धमकी दिली. तसेच चाँदबिबी महाल येथे गेल्यावरही नवर्‍याला ठार मारण्याची धमकी देत मनोज याने फिर्यादी महिलेसोबत संबंध (sexual  Relation) केले. फोटो व व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत अत्याचार केला. याप्रकरणी पीडिताने तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी आरोपीचा शोध घेत त्याला अटक केली. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक नितीन रणदिवे करीत आहे.

Web Title: Sexual abuse a  woman threatening to make photos and videos viral arrested

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here