Home अहमदनगर अत्याचाराचे मोबाईलमध्ये चित्रिकरण करून, व्हायरल करण्याची धमकी देत….

अत्याचाराचे मोबाईलमध्ये चित्रिकरण करून, व्हायरल करण्याची धमकी देत….

sexual abuse Threatening to go viral by filming atrocities in mobile

अहमदनगर  | Ahmednagar:  तरुणीला लग्नाचे आमिष दाखवुन अत्याचार (sexual abuse) केला अन त्याचे मोबाईलमध्ये चित्रिकरण करून वेळोवेळी पैशाची मागणी केल्याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात अत्याचार करणार्‍या तरूणाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पीडित तरूणीने फिर्याद दिली आहे. गणेश शिंदे (रा. शिंदे मळा, बालिकाश्रमरोड, अहमदनगर) असे गुन्हा दाखल झालेल्या तरूणाचे नाव आहे.

अहमदनगर शहरातील एका उपनगरात राहणार्‍या तरूणीची 13 वर्षांपूर्वी गणेश सोबत ओळख झाली. त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. गेल्या 10 महिन्यांपूर्वी गणेशने फिर्यादी तरूणीला त्याच्या घरी बोलवून लग्नाची मागणी घातली. त्या मागणीला तरूणीने होकार दिला. तेव्हा गणेशने माझ्या इच्छेविरूध्द संबंध प्रस्थापित केले व त्याचे मोबाईलमध्ये चित्रकरण केले असल्याचे तरूणीने फिर्यादीत म्हटले आहे. संबंधाचे केलेले चित्रीकरण सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत गणेशने तरूणीकडे पैशाची मागणी केली.

तरूणीने वेळोवेळी गणेशच्या वेगवेगळ्या मित्रांच्या फोन पे वर पैसे पाठविले. गणेशच्या दोन्ही दाजींनी तरूणीसोबत गणेशचे लग्न लावून देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, त्यांनी गणेश सोबत लग्न लावुन दिले नाही. गणेशने 20 फेब्रुवारी 2022 रोजी घरी बोलवून त्याचे दाजी घरी असताना माझ्यासोबत संबंध ठेवले असल्याचे पीडित तरूणीने फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास तोफखाना पोलीस करीत आहेत.

Web Title: sexual abuse Threatening to go viral by filming atrocities in mobile

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here