Home Ahmednagar Live News संतापजनक: तरुणीला दारू पाजून दोघा भावांनी केला अत्याचार

संतापजनक: तरुणीला दारू पाजून दोघा भावांनी केला अत्याचार

girl was sexual abuse by two brothers by drinking alcohol

अहमदनगर | Ahmednagar: अहमदनगर शहरातून धक्कादायक घटना समोर आली आहे. तरुणीला दारू पाजून बेशुध्द केले व तिच्यावर दोघा भावांनी आळीपाळीने अत्याचार (Sexual abuse) केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी दोघा भावांविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी सकाळी ही घटना घडली.

तुषार तुकाराम चव्हाण, रोनक तुकाराम चव्हाण (दोघे रा. नक्षत्र लॉनजवळ, बुरूडगाव रोड, अहमदनगर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत पीडित तरुणीने फिर्याद दिली आहे.

सोमवारी सकाळी फिर्यादी तरुणी घरी एकटीच असताना तुषार व रोनक हे दोघे तिच्या घरात आले व म्हणाले, ‘ आम्हाला जेवण करायचे आहे. तेव्हा तरुणी त्यांना म्हणाली, ‘ तुम्ही आधी घराबाहेर जा, माझ्या घरात तुम्हाला जेवण मिळणार नाही’. तेव्हा तुषारने तरुणीला धरले व रोनकने खिशातून दारूची बाटली काढून तरुणीला दारू पाजली. दारू पाजल्यामुळे तरुणी बेशुध्द झाली यानंतर तुषार व रोनकने आळीपाळीने तिच्यावर अत्याचार (Sexual abuse) केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक विवेक पवार हे करीत आहेत.

Web Titile: girl was sexual abuse by two brothers by drinking alcohol

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here