Home अहमदनगर अहमदनगर: अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध, गर्भपाताच्या गोळ्या देऊन अत्याचार

अहमदनगर: अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध, गर्भपाताच्या गोळ्या देऊन अत्याचार

Ahmednagar News: तरुणाने अल्पवयीन मुलीस लग्नाचे अमीष दाखवून तिला फूस लावून शारीरिक संबंध (Sexual abused) ठेवल्याची घटना तसेच गर्भपाताच्या गोळ्या देऊन गर्भपात करण्यास भाग पाडून धमक्या दिल्याची घटना.

Sexual abused with a minor girl by luring her into marriage

नेवासा | Nevasa: नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथील तरुणाने अल्पवयीन मुलीस लग्नाचे अमीष दाखवून तिला फूस लावून शारीरिक संबंध ठेवल्याची घटना घडली. याबाबत फिर्यादीवरुन तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत नेवासा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, सुनील अंबादास तांबे रा. घोडेगाव ता. नेवासा याने डिसेंबर 2021 ते 31 मार्च 2023 या काळात छत्रपती संभाजीनगर येथे बळजबरीने तसेच तिला फूस लावून व तिच्यासोबत लग्न करतो असे खोटे आश्वासन देवून ती अल्पवयीन आहे हे माहिती असतानासुद्धा आरोपीने फिर्यादीसोबत शरीरसंबंध ठेवले.

तसेच फिर्यादीचे पती यांचेपासून फिर्यादीला दिवस गेलेले असतानासुद्धा आरोपीने फिर्यादीशी शरीरसंबंध ठेवता यावे म्हणून फिर्यादीला गर्भपात होण्याच्या गोळ्या आणून देवून तिचा तीन महिन्याचा गर्भपात करण्यास भाग पाडले. फिर्यादीला मारहाण करुन मुक्का मार देवून शिवीगाळ केली. तसेच जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या.

या फिर्यादीवरुन नेवासा पोलिसांनी सुनील अंबादास तांबे याच्याविरोधात भारतीय दंड विधान कलम 376(2)(एन), 420, 313, 323, 504, 506, बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम 2012 चे कायदा कलम 4, 6, 8 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक श्री. थोरात करत आहेत.

Web Title: Sexual abused with a minor girl by luring her into marriage

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here