Home महाराष्ट्र धक्कादायक: प्रेमप्रकरणातून अल्पवयीन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार करून निर्घुण हत्या

धक्कादायक: प्रेमप्रकरणातून अल्पवयीन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार करून निर्घुण हत्या

Sexual assault on a minor girl in a love affair

Nagpur Crime | नागपूर: नागपूरमध्ये खळबळजनक घटना समोर आली आहे. मौदा येथे १० वीत शिकणाऱ्या एका अल्पवयीन लैंगिक अत्याचार (Sexual assault) करून निर्घुण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्रेमप्रकरणातून ही घटना घडली असल्याची प्राथमिक माहिती तपासात समोर आली आहे. मौदा पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे. बुधवारी रात्री ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी पोलीस तपास करीत आहे.  

या प्रकरणातील अल्पवयीन विद्यार्थिनी ही १५ वर्षांची आहे. ती शिकवणी वर्ग झाल्यानंतर घरी परत जात असताना आरोपी धीरज शेंडे याने तिला बळजबरीने त्याच्या मोटरसायकलवर बसवले. त्यानंतर आरोपीने तिला कुही शिवारातील साळवा जंगलात नेले. तिथे तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्यानंतर तिची निर्घृण हत्या केली. ही घटना बुधवारी रात्री उघडकीस आली. त्यानंतर मौदा पोलिसांनी तपास सुरू केला असता यामध्ये मौदा येथील भामेवाडा येथील धीरज सुरेश शेंडे नामक आरोपीचा सहभाग निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

या प्रकरणात आरोपी धीरज सोबत मुलीची ओळख ही इन्स्टाग्रामवर झाली होती. त्यानंतर दोघांमध्ये जवळीक निर्माण झाली होती. मात्र ती मुलगी दुसऱ्या मुलाच्या संपर्कात असल्याची माहिती समजल्‍याने संतापलेल्या आरोपीने तिच्यावर अत्याचार करून तिची हत्या केली असल्याची माहिती उघड झाली आहे.  सावळा जंगलात अल्पवयीन मुलीचा रक्ताच्या थारोळ्यातला मृतदेह आढळून आल्यानंतर मौदा पोलिसांनी तपास पोलिसांनी सुरू केला आहे.

Web Title: Sexual assault on a minor girl in a love affair

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here