Home पुणे व्हिडीओ कॉल करून तुझे शरीर दाखव, धमकी देऊन तरुणीकडे शरीर सुखाची मागणी

व्हिडीओ कॉल करून तुझे शरीर दाखव, धमकी देऊन तरुणीकडे शरीर सुखाची मागणी

Demanding sexual relation and nude video call from the young woman by threatening

पिंपरी चिंचवड: तरुणाने लग्नाची मागणी घातली त्यास तरुणीने नकार दिला. व्हिडीओ कॉल करून तुझे शरीर दाखव, अशी मागणी (sexual relation and nude video call)तरुणीकडे केली तसेच धमकीही देण्यात आली. याप्रकरणी तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. हे प्रकरण २०२० ते २२ जन २०२२ या कालवधीत चिंचवड येथे घडले.

शुभम मनोहर पवार वय २३ रा. लखमापुरी ता. शेवगाव अहमदनगर असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पिडीत तरुणीने चिंचवड पोलीस ठाण्यात बुधवारी फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, आरोपीने फिर्यादीला लग्नाची मागणी घातली. मात्र फिर्यादी तरुणीने त्यास नकार दिला. माझे शिक्षण पूर्ण झाल्यावर आई वडिलांना लग्नाबद्दल विचारून सांगते असे तरुणीने सांगितले. त्यानंतर आरोपी शुभम याने तरुणीकडे शारीरिक संबधाची मागणी केली. व्हिडीओ कॉल करून तुझे शरीर दाखव, असे आरोपी म्हणाला. त्यामुळे फिर्यादीच्या मनात लज्जा उत्पन्न झाली. फिर्यादी तरुणीने त्यास नकार दिला.

मी तुझ्या घरच्यांना आत्महत्या करायला प्रवृत्त करेल अशी धमकी आरोपीने फिर्यादीला दिली. तु माझ्याशी लग्न केले नाही तर मी आत्महत्या करेन अशी धमकी वारंवार फोन करू  दिली. तुझे दुसऱ्या मुलाबरोबर अफेअर आहे. तू मला धोका दिला तर तुझी सगळी जिंदगी बरबाद करेन अशीही धमकी दिली. आरोपी हा फिर्यादीच्या घरासमोर रिक्षा घेऊन आला. फिर्यादीचा पाठलागही केला. फिर्यादीच्या आईच्या फोनवर फोन केला. भेटायला येते की नाही अशी धमकी दिली.

Web Title: Demanding sexual relation and nude video call from the young woman by threatening

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here