Home पुणे अल्पवयीन मुलीला निर्जनस्थळी नेलं अन… धक्कादायक प्रकार

अल्पवयीन मुलीला निर्जनस्थळी नेलं अन… धक्कादायक प्रकार

Breaking News | Pune Crime: विवाहाच्या आमिषाने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार (abused) केल्याचा प्रकार.

Sexually assaulting a minor girl with the lure of marriage

पुणे : पुण्यातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पुण्यात विवाहाच्या आमिषाने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.  याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अक्षय अशोक बनसोडे (वय २९, रा. इंदिरानगर, बिबवेवाडी) असे गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. याबाबत मुलीच्या आईने मार्केट यार्ड पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

याबाबत माहिती अशी की, बनसोडे आणि पीडित मुलीचे प्रेमसंबंध होते. मुलगी अल्पवयीन असल्याची माहिती बनसोडेला होती. त्याने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. बनसोडेने तिला पळून जाऊ विवाह करू, असे सांगितले. सोमवारी (१२ ऑगस्ट) रात्री मुलगी कोणाला काही न सांगता घरातून बाहेर पडली. दुसऱ्या दिवशी मुलगी घरी आली. मुलीच्या आईने तिच्याकडे चौकशी केली. तेव्हा सोमवारी रात्री आरोपी बनसोडेने तिला मार्केटयार्ड भागात बोलावून घेतल्याचे सांगितले. तर, एका निर्जनस्थळी नेहून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे मुलीने आईला सांगितले. मुलगी अल्पवयीन असल्याची माहिती असताना बनसोडेने प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे तक्रारीत म्हंटले आहे. सहायक निरीक्षक कट्टे अधिक तपास करत आहेत.

Web Title: Sexually assaulting a minor girl with the lure of marriage

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here