Home अहमदनगर राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचा शिवसेनेत प्रवेश

राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचा शिवसेनेत प्रवेश

Shankarrao Gadakh joins Shiv Sena

अहमदनगर | Ahmednagar: राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचा शिवसेनेत प्रवेश केला आहे. मंगळवारी दुपारी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर मंत्री शंकरराव गडाख यांनी शिवबंधन बांधून प्रवेश केला.

मंत्री गडाख यांनी  उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला यावेळी शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर उपस्थितीत होते.

नगर शहरात मागील आठवड्यात माजी मंत्री अनिल राठोड यांचे आकस्मिक निधन झाले. यामुळे शिवसेनेत मोठी पोकळी निर्माण झाली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्री गडाख यांच्यावर नगर जिल्हाची जबाबदारी सोपविली आहे. यावेळी शंकरराव गडाख म्हणाले माझ्या प्रवेशामुळे शेतकऱ्यांचे विविध प्रश्न अधिक जोमाने सोडवू शकेल.

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे व माजी खा. यशवंतराव गडाख यांचे सलोख्याचे संबंध होते. आता दुसऱ्या पिढीतील सदस्य शिव बंधनात बांधले गेले आहेत. यावरून भविष्यात नगर मधील राजकीय गणिते बदलणार हे काही सांगायला नको.

Web Title: Shankarrao Gadakh joins Shiv Sena

Get Latest Marathi News  and Ahmednagar News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here