Home अकोले Akole: अकोले तालुक्यात आज पाच कोरोनाबाधितांची वाढ  

Akole: अकोले तालुक्यात आज पाच कोरोनाबाधितांची वाढ  

Akole Taluka five coronavirus infected today

अकोले | Akole: अकोले तालुक्यात आज आणखी पाच करोनाबाधितांची वाढ झाली आहे. यामध्ये शहरातील शिवाजीनगर भागात कोरोनाचा पुन्हा शिरकाव झाला आहे. देवठाण, कोतूळ या भागात करोनाबाधित आढळून आले आहेत. त्यामुळे तालुक्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या २१३ इतकी झाली आहे.

रविवार दि ०९ ॲगस्ट रोजी खानापुर कोविड सेंटर येथून तालुक्यातील ४७ व्यक्तीचे स्वॅब अहमदनगर येथील शासकीय  प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवलेले होते त्यांचा आज मंगळवारी सकाळी अहवाल प्राप्त झाले असून  यात तालुक्यातील पाच व्यक्तीचा कोरोना अहवाल पॅाझिटीव्ह आला आहे. यामध्ये कोतुळ येथील कोरोनाने मयत व्यक्तीची ३५ वर्षीय पत्नी,  ५ वर्षीय लहान मुलगा, शहरातील शिवाजीनगर येथील ५२ वर्षीय व्यक्ती तर देवठाण येथील ५० वर्षीय पती,  ४५ वर्षीय पत्नी याचा कोरोना अहवाल पॅाझिटीव्ह आला आहे. तालुक्यातील एकुण बाधितांची संख्या २१३ झाली आहे त्यापैकी १५६ व्यक्ती कोरोनामुक्त झाले . ०५ मयत झालीय तर ४७ व्यक्तीवर उपचार सुरू आहे.

Web Title: Akole Taluka five coronavirus infected today

Get Latest Marathi News  and Ahmednagar News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here