Home संगमनेर संगमनेर: कार व दुचाकीत धडक, शिक्षकाचा मृत्यू

संगमनेर: कार व दुचाकीत धडक, शिक्षकाचा मृत्यू

Sangamner car and two wheeler Accident at talegaon Dighe

संगमनेर: संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे शिवारात हाडवळा परिसरात कार व दुचाकी यांच्यात अपघात झाल्याने एका शिक्षकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. रविवारी दुपारी ही घटना घडली.

रामहरी लहानू भागवत वय ४४ असे या अपघातात मृत्यू झालेल्या शिक्षकाचे नाव आहे. न्यू इंग्लिश स्कुल व उच्च माध्यमिक विद्यालयात ते शिक्षक म्हणून कार्यरत होते.

कोपरगाव रस्त्यावर वॅगनर कार व भागवत यांची दुचाकी (एम.एच.१७ बी.जे.८९१९) यांच्यात रस्त्यावरून जात असताना धडक झाली. या धडकेत भागवत हे गंभीर जखमी झाले. त्यांना संगमनेर येथे कुटे हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला.

याबाबत गणेश एकनाथ अरगडे रा. सुकेवाडी यांनी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून वॅगनर चालकाविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. भागवत यांच्या पश्चात आई वडील चार बहिणी, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.

वाचकहो, ‘युवा बात संगमनेर अकोले न्यूज’ ला व्हाटस अप वर फॉलो करताय ना?… अजून जॉईन केले नसेल तर क्लिक करा -(Sangamner Akole News) आणि मिळवा ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलवर.  

Website Title: Sangamner car and two-wheeler Accident at Talegaon Dighe

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here