Sangamner: संगमनेर तालुक्यात दिवसभरात २२ रुग्ण करोनाबाधित
Sangamner | संगमनेर: तालुक्यात आज सोमवारी सकाळी चार रुग्ण आढळून आल्यानंतर सायंकाळी पुन्हा १८ रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे तालुक्यातील करोनाबाधितांची संख्या १०२४ इतकी झाली आहे.
आज सोमवारी सकाळी आलेल्या खाजगी प्रयोगशाळेच्या अहवालानुसार संगमनेर शहर व तालुक्यात चार जणांना कोरोनाची बाधा झाली. तर सायंकाळी पुन्हा एंटिजन टेस्ट च्या अहवालातून शहर व तालुक्यातील १८ जणांना कोविडचा संसर्ग झाल्याचे पुढे आले. सकाळी तालुक्यातील सुकेवाडी येथील ७४ वर्षीय पुरुष तर शहरातील वकील कॉलनी येथील ४५ वर्षीय पुरुष, मोगलपुरा येथील ३३ वर्षीय पुरुष, अभंग मळा ७४ वर्षीय महिला असा एकूण ४ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
सायंकाळी आलेल्या अहवालात शहरातील साळीवाडा येथील ४५,६० वर्षीय महिला तर ३ वर्षीय बालिका तसेच ३५ वर्षीय पुरुष बाधीत आढळून आला. विद्यानगर येथे ५२ वर्षीय पुरुष, मालदाड रोड येथे २६ वर्षीय पुरूष, मोगलपुरा येथे ३४ वर्षीय महिला, जनतानगर येथे २७ पुरूष, परदेशपुरा येथे ६१ ,१६ वर्षीय पुरुष, ३५ ,९ ,१६ ,१४ वर्षीय महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. तर तालुक्यातील ग्रामीण भागातील पिंपारणे येथे ५० वर्षीय पुरुष, वडगाव पान येथे ५५ वर्षीय पुरुष, ढोलेवाडी येथे ४० वर्षीय पुरूष, वेल्हाळे येथे ६५ वर्षीय पुरूष असे नवे १८ रुग्ण आढळून आले आहे.
वाचकहो, ‘युवा बात संगमनेर अकोले न्यूज’ ला व्हाटस अप वर फॉलो करताय ना?… अजून जॉईन केले नसेल तर क्लिक करा -(Sangamner Akole News) आणि मिळवा ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलवर.
Website Title: Sangamner Taluka 22 new coronaviruses infected