Home अहमदनगर जिल्हा बँकेचे अध्यक्ष पदासाठी कोण शेळके की मुरकुटे  

जिल्हा बँकेचे अध्यक्ष पदासाठी कोण शेळके की मुरकुटे  

Shelke or Murkute for the post of District Bank Chairman

अहमदनगर | Ahmednagar: जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदासाठी शुक्रवारी अचानक दोन नावे समोर आली आहेत. उदयन शेळके व भानुदास मुरकुटे यापैकी कोण याचा निर्णय शनिवारी दुपारीच घेतला जाणार आहे.

याबाबत निर्णय वरिष्ठ पातळीवर होणार असल्याने अध्यक्षपद नेमकी कुणाकडे याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.

जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडीसाठी शनिवारी दुपारी एक वाजता बँकेच्या मारुतराव घुले पाटील सभागृहात संचालक मंडळाची बैठक आयोजित करण्यात येणार आहे. या अध्यक्ष पदासाठी आमदार चंद्रशेखर घुले व राहुल जगताप यांची नावे चर्चेत होती. मात्र निवडीच्या एक दिवस अगोदर शुक्रवारी वारे वेगाने फिरत आणखी दोन नावे चर्चेत आली आहे. यात पारनेरचे उदय शेळके, तर श्रीरामपूरचे भानुदास मुरकुटे असे आहे.

बँकेच्या कारभाराला शिस्त व विरोधकाबाबत रोखठोक भूमिका असे निकष लावले गेले आहे. शेळके यांना महानगर बँक कारभाराचा अनुभव आहे, शेळके कणखर भूमिका बँकेत घेतील असे काहींचे म्हणणे आहे. या अध्यक्ष पदासाठी चार जणाची नावे चर्चेत आहेत. यामध्ये शेळके यांचे नाव पहिल्या क्रमांकावर आहे असे वृत्त आहे. संचालक बिनविरोध निवडून आणताना महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना काही तडजोडी कराव्या लागल्या. त्यातून मुरकुटे यांचे नाव समोर आहे. मात्र त्यातून किती महत्व देतात यावर बरेच काही अवलंबून आहे. संगमनेरचे माधवराव कानवडे हे उपाध्यक्षपदासाठी चर्चेत आहेत. मात्र महसूलमंत्री थोरात उपाध्यक्षपद कोणाच्या गळ्यात टाकणार हे पाहणे औत्सुक्य ठरेल.  

Web Title: Shelke or Murkute for the post of District Bank Chairman

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here