Home अकोले अकोले तालुक्यात आज याठिकाणी करोनाबाधितांची वाढ

अकोले तालुक्यात आज याठिकाणी करोनाबाधितांची वाढ

Akole taluka Today increased corona Patient 

अकोले | Akole: अकोले तालुक्यात आज शुक्रवारी प्राप्त झालेल्या अहवालात पाच जण करोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे तालुक्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या ३२९१ इतकी झाली आहे.

आज प्राप्त झालेल्या अहवालात गणेशखिंड देवठाण येथे ५३ वर्षीय पुरुष, आंबड येथे ३७ वर्षीय महिला, केळुंगण येथे एक महिला, राजूर येथे ३७ वर्षीय महिला, ५२ वर्षीय पुरुष असे पाच जण बाधित आढळून आले आहेत.

दरम्यान अहमदनगर जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार मागील २४ तासांत ३०३ रुग्णांची भर पडली आहे. सध्या जिल्ह्यात १३९४ रुग्ण उपचार घेत आहेत. जिल्ह्यात आज १८६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या ७७११० इतकी झाली आहे तर एकूण मृत्यू ११५२ इतके झाले आहेत.  

Web Title: Akole taluka Today increased corona Patient 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here