Home अहमदनगर मोबाईल न दिल्याने दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

मोबाईल न दिल्याने दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

Shevgaon Suicide of a 10th standard student 

शेवगाव | Shevgaon: शेवगाव शहरातील खंडोबानगर येथे महागाचा मोबाईल घेऊन न दिल्याने दहावीतील विद्यार्थ्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली.

ओम दत्तात्रय वाघ वय १६ असे या आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. तो भराडे हायस्कूलमध्ये इयत्ता दहावीत शिकत होता.

ओम वाघ याने आपल्या घरच्यांकडे महागड्या किमतीचा मोबाईल घेण्यासाठी हट्ट धरला होता. त्याला घरच्यांनी मोबाईल न घेऊन दिल्यामुळे तो नाराज होता. बुधवारी सायंकाळच्या सुमारास त्याने राहत्या घरी छताला कंबरेच्या पट्ट्याने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविली. साडे सात वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. असे सुनील म्हस्के यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हंटले आहे. याप्रकरणी शेवगाव पोलीस ठाण्यात सुनील म्हस्के यांनी खबर दिली आहे. ओम हा होतकरू व हुशार विद्यार्थी होता, तो शहरातील अनेक तरुणांचा परिचयाचा होता. नवनवीन प्रयोग करणे त्याला आवडत होते.  

Web Title: Shevgaon Suicide of a 10th standard student 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here