Home अहमदनगर केरळच्या पुरग्रस्तांसाठी मुस्लीम बाधवांकडुन ५० हजाराचा ‍निधी

केरळच्या पुरग्रस्तांसाठी मुस्लीम बाधवांकडुन ५० हजाराचा ‍निधी

केरळच्या पुरग्रस्तांसाठी मुस्लीम बाधवांकडुन ५० हजाराचा ‍निधी

शिर्डी /प्रतिनिधी:: केरळमधील पुरामुळे आपदग्रस्त झालेल्या पुरग्रस्तांसाठी शिर्डीतील मुस्लीम बांधवाच्या वतीने ५० हजार रुपयांची मदत देण्यात येणार आहे. शिर्डीत बकरी ईद मोठया उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी मुस्लीम बांधवांच्या वतीने केरळच्या पूरग्रस्तांना ‍ आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी देशात शांतता राहावी, सर्व समाजात बंधुभाव निर्माण होऊन एकोपा रहावा राज्यात पर्जन्यवृष्टी होऊन दुष्काळची परिस्थितीमुळे कायमस्वरुपी दूर व्हावी यासाठी प्रार्थना करण्यात आली.

You May Also LikeDeepika Padukone Ranveer Singh Marriage Date

केरळमध्ये निर्माण झालेल्या पूरग्रस्त परिस्थितीमुळे  याठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले असून आर्थिक मदतीचा सर्व स्तरातुन ओघ मिळत आहे. पूरग्रस्तांना मदतीचा हात दिला जावा यासाठी नगरसेवक हाजीबीलाल शेख यांनी आजाद ग्रुपच्या माध्यमातुन सर्व मुस्मिम समाजास मदत देण्याचे आवाहान केले. त्यांचा अवहनास प्रतिसाद देत मुस्लिम बांधवांनी याच ठिकाणी ३० हजार रुपये जमा केले. उर्वरित रक्कम दोन चार दिवसात जमा करुन ५० हजार रुपयंचा निधी केरळ येथे पाठविण्यासाठी शासकीय ‍अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात येणार आहे. र्शिडी येथे ईद उल अज्हा सण साजरा करण्यात आला. ईदगाह मैदानावर मौलान मन्सुर यांनी नमाज पठण केले. आणी मौलाना अन्वर यांनी खुतबा पठण केले जगामध्ये शांतता राहावी यासाठी दुऑ करण्यात आली. मौ. मन्सुर यांनी सणाचे महत्व सांगितले.

जामा मस्जीदचे अध्यक्ष हाजी नसीर भाई तसेच सर्व ट्रस्टीचे चांगले काम चालले म्हणुन‍ नगरसेवक हाजी बिलाल शेख यांनी प्रशंसा केली. यावेळी शौकतभाई सय्यद, जमादारभाई इनामदार, बाबभाई सय्यद , गफारभाई पठाण, सलीमभाई शेख, आझाद ग्रुप, अब्दुल कलाम संस्था,  मुस्लिम युवा मंच यांच्यासह मोठया संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित होते.


मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा


आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. रहा अपडेट दररोज. धन्यवाद.  मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा.


ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा. आपल्याला ही बातमी आवडल्यास फेसबुक वर जरूर शेअर करा धन्यवाद.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here