Home महाराष्ट्र सेल्फीने घेतला संपूर्ण कुटुंबाचा जीव

सेल्फीने घेतला संपूर्ण कुटुंबाचा जीव

सेल्फीने घेतला संपूर्ण कुटुंबाचा जीव

बुलढाणा (वृत्तसंस्था) : नवीन दूचाकी घेऊन शेवगावला गेलेले कुटुंब परतीच्या प्रवासात संग्रामपूर तालुक्यातील पुर्णा नदीच्या  खिरोडा पुलाजवळ थांबले. सेल्फी घेत असतांनाच मुलगा कोसळला. त्याला वाचवण्यासाठी वडील व आईनेही उडी घेतली. मात्र सततच्या पावसाने नदीच्या जलस्तर अधिक असल्याने ‍तिघेही वाहुन गेले. तर अमरावती येथे सिपना इंजीनीअरिंग कॉलेजमगील खदानीत पोहयला गेलेले युवक बुडाला. बुधवारी सायंकाळाच्य सुमारस या दोन्ही खळबळजनक घटना घडल्या.

बुलडाला जिल्हयातील जळगाव – जामोद तालुक्यातील बुलडाणा अर्बन या पतसंस्थेत कार्यरत राजेश चव्हाण (४२) यांनी नवीन दुचाकी खरेदी केली. म्हणुन पत्नी सारिका (३५) व मुलगा श्रावण (११) यांच्यासह शेगावला आले होते. परत जळगावात-जामोदकडे निघाले होते. संग्रामपूर तालुक्यातील पुर्णा नदीच्या खिरोडा येथील पुलावरुन जात असताना पावसामुळे फुललेला निसर्ग आणि नदाचा जलस्तर पाहून त्यांना सेल्फी घेण्याचा मोह झाला.

You May Also LikeDeepika Padukone Ranveer Singh Marriage Date

दुचाकी थांबवुन त्यांनी नदीजवळ जावून सेल्फी घेण्याचा प्रयत्न केला. सेल्फी घेत असतानाच सुरुवातीला मुलगा पाण्यात पडला. त्यानंतर आई आणि वडील एकमेकांना वाचविण्याच्या प्रयत्नात हे तिघेही या पूर्णा नदीच्या पाण्यात वाहुन गेले. या संपूर्ण प्रकार या पुलावरुन जाणाऱ्या गातकऱ्यांचा लक्षात आला. त्यांनी या तिघांनाही वाचविण्याचा प्रयत्ना केला. मात्र त्यांना यश आले नाही. गावकऱ्यांचा मदतीने पोलिस शोध मोहीम राबवित आहेत. सततच्या पावसामुळे नदीचा जलस्तर वाढल्याने त्यांचा शोध घेण्यात अडचणी येत आहेत. अंधार पडल्यामुळे बचत कार्यामध्ये अडथळा आल्याने नंतर शोध माहीम थांबविण्यात आली. सुटीचा दिवस असल्याने शेगावरुन जळगाव-जामोदकडे परतत असताना खिरोडा पुलावरील पाण्याजवळ सेल्फी घेण्याचा मोह चव्हाण कुटुंबाला नडला. मुलगा पाण्यात पडला त्याला वाचविण्याकरीता आईवडीलही वाहुन गेले. राजेश गुलाबराव चव्हाण(४२), सारिका राजेश चव्हाण (३५) व श्रावण राजेश चव्हाण (११) अशी त्यांची नावे आहेत.


मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा


आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. रहा अपडेट दररोज. धन्यवाद.  मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा.


ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा. आपल्याला ही बातमी आवडल्यास फेसबुक वर जरूर शेअर करा धन्यवाद.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here