Home संगमनेर संगमनेर येथील मंगळापुर गावचे सुपुत्र दत्तु भोकनळची सुवर्णपदकाची कमाई

संगमनेर येथील मंगळापुर गावचे सुपुत्र दत्तु भोकनळची सुवर्णपदकाची कमाई

संगमनेर येथील मंगळापुर गावचे सुपुत्र दत्तु भोकनळची सुवर्णपदकाची कमाई

जकार्ता(वृत्तसंस्था): एशियन गेम्समध्ये आजचा सहावा ‍दिवस भारतासाठी सोनियाचा ठरला. भारताचे दोन सुवर्ण आणि तीन कांस्य पदकासह एकुण पाच पदकं जिंकली आहेत. टेनिस दुहेरीत आणि नौकानयनात सुवर्ण पदक पटकावले. आपापर्यंत स्पर्धेत भारताने एकुण सहा सुवर्ण पदकाची कमाई केली आहे. आज सहाव्या दिवशी महिला कबडडीमध्ये अंतिम फेरीत भारताला इराणचे आव्हान असणार आहे. तर जिम्नॅस्टिक बॅलन्स तीस प्रकारत दीपा कर्मकारचा अंतिम फेरीत सामना होणार आहे. तर त्यामुळे भारतीयांना आज आणखी दोन सुवर्ण पदकांची आस लागली आहे.

You May Also LikeDeepika Padukone Ranveer Singh Marriage Date

संगमनेरची ज्ञान असलेल्या रोईंगपटु दत्तु बबन भोकनळ व त्याचे तीन साथीदार स्वर्ण सिंह, ओम प्रकाश व सुखमीत सिंह यांनी नैकानयन सांघिक प्रकारात सुवर्णपदकाची कमाई केली आहे. यावेळी भारतीय संघाने ६:१७:१३ अशी वेळ नोंदवत आपल्या प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकले. याआधी भारताने नौकानयनमध्ये २ कांस्यपदके मिळवले आहेत.  या कामगिरीमुळे भारताच्या खात्यात आणखी एका सुवर्ण पदाकी कमाई झाली आहे. या स्पर्धतील हे भारताचे पाचवे सुवर्णपदक आहे.

दत्तु भोकनळ हे संगमनेर येथील मंगळापुर गावचे सुपुत्र असून नुकतीच अमृत उद्योग समूहाच कार्यक्रमाप्रसंगी त्यांनी संगमनेरला भेट दिली होती. भारताचा अनुभवी खेळाडु रोहन बोपन्ना आणि दिवीज शरण यांच्या जोडीने टेनिस दुहेरीत सुवर्ण पदक पटकावले. बोपन्ना आणि शरण यांनी अंतिम फेरीत कझागिस्तानच्या अलेक्झांडर चुबलिक आणि डेनिस येबसेब यांच्या जोडीला ६-३, ६-४ अशा सरळ सेटमध्ये मात देत सुवर्ण पदकावर नाव कोरले. भारताची अनुभवी नेमबाज हिना सिध्दुला महिला गटात १० मीटर एअर रायफल पिस्तुल स्पर्धेत कांस्य पदकावर समाधान मानावे लागले. तर, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धतील पदक जिंकण्यास अपयशी ठरली. मनु भाकर १७६.२ अंकासह पाचव्या स्थानी राहिली.

संगमनेरच्या दत्तु भोकनळने सुवर्ण पदकाला गवसणी घातल्याने संगमनेरातून त्याच्यावर व त्याच्या सहकाऱ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा


आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. रहा अपडेट दररोज. धन्यवाद.  मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा.


ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा. आपल्याला ही बातमी आवडल्यास फेसबुक वर जरूर शेअर करा धन्यवाद.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here