Home राहाता पोलीस कर्मचारी लाचलुचपत पथकाच्या जाळ्यात

पोलीस कर्मचारी लाचलुचपत पथकाच्या जाळ्यात

Shirdi Police personnel caught in bribery squad

शिर्डी | Shirdi: शिर्डी पोलीस ठाण्यात एक कर्मचारी तपासासाठी सातत्याने पाच हजार रुपयांची मागणी करत होता. या पोलीस कर्मचाऱ्याला पाच हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत पथकाच्या विभागाने रंगेहाथ पकडले आहे.

प्रवीण दिलीप अंधारे रा. शिर्डी असे या पोलीस कर्मचार्याचे नाव आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दीपक करांडे यांच्या पथकाने केली आहे.

याबाबत माहिती अशी की, शिर्डी पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रात असलेल्या जवळके परिसरात काही दिवसांपूर्वी अकस्मात मृत्यूची घटना घडली होती. या घटनेत मयताच्या भावाकडे तपासातील खर्चापोटी पाच हजार रुपयांची मागणी करत होता.

याबाबत तक्रारदाराने अहमदनगर येथील लाचलुचपत विभागाचे अधिकारी हरीश खेडकर यांच्याकडे तक्रार करण्यात आली. याप्रकरणी पथकाने सापळा रचून शिर्डी पोलीस स्टेशन आवारात पंचासमक्ष पाच हजारांची लाच घेताना प्रवीण दिली अंधारे यास रंगेहाथ पकडण्यात आले आहे. ही कारवाई शुक्रवारी करण्यात आली.  

महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळावा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.

See:  Latest Entertainment News, Latest Ahmednagar News in Marathi, and  Latest Marathi News

Web Title: Shirdi Police personnel caught in bribery squad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here