Home संगमनेर संगमनेर बस स्थानकाच्या शौचालयास नारायण राणे यांचे नाव देत निषेध  

संगमनेर बस स्थानकाच्या शौचालयास नारायण राणे यांचे नाव देत निषेध  

Shiv Sainiks protest against Narayan Rane's statement at Sangamner today

संगमनेर | Sangamner: नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी शिवसैनिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. नारायण राणे यांच्या वक्तव्याचा संगमनेरात आज शिवसैनिकांनी निषेध करत तीव्र निदर्शने करण्यात आली.  संगमनेर बस स्थानकाच्या सार्वजनिक शौचालयास नारायण राणे यांचे नाव देत निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी त्यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

यावेळी शिवसेनेचे शहर प्रमुख अमर कतारी, शहर संघटक पप्पु कानकाटे, कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष मुजीब शेख, पंचायत समितीचे विरोधी पक्षनेते अशोक सातपुते, युवासेनेचे जिल्हाध्यक्ष अमित चव्हाण, युवा सेनेचे भाऊसाहेब हासे, अमोल कवडे, रमेश काळे, ज्ञानेश्वर कंदळकर,  माधव फुलमाळी, दिपक वनम, संजय फड, शीतल हासे, राजेंद्र झिंजुर्डे, सदाशिव हासे, रवी गिरी, अक्षय बिल्लाडे, असिफ तांबोळी, विकास डमाळे, दत्तू नाईक, अमोल डुकरे, भीमा पावसे, वेणूगोपाल लाहोटी, राजू सातपुते, किरण सानप, नरेश माळवे, दीपक साळुंके, प्रथमेश बेल्हेकर, अनुप म्हाळस, शुभम भोईर, जयवंत पवार, रुपेश धाकतोडे, बबन सातपुते, प्रसाद पवार, बाळासाहेब राऊत, सचिन साळवे, आदि उपस्थित होते. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती कोकाटे यांनी आंदोलनकर्त्यांचे निवेदन स्विकारले.

Web Title: Shiv Sainiks protest against Narayan Rane’s statement at Sangamner today

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here