Home महाराष्ट्र केंद्रीय मंत्री नारायण राणेंना अटक, राणेंची तब्येत ठीक नाही, रुग्णालयात दाखल होण्याची...

केंद्रीय मंत्री नारायण राणेंना अटक, राणेंची तब्येत ठीक नाही, रुग्णालयात दाखल होण्याची गरज

Narayan Rane Arrested

Narayan Rane Arrested:  राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना रत्नागिरी पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. त्यांना अटक करून संगमेश्वर पोलीस ठाण्यात नेण्यात आले आहे. पोलिसांनी ताब्यात घेण्याअगोदर आरोग्य पथकाने त्याच्या आरोग्याची तपासणी केली होती. त्यांची तब्येत ठीक नसल्याची माहिती समोर आली आहे अशी माहिती आरोग्य तपासणी डॉक्टरांनी दिली आहे.

त्यांच्या आरोग्याची तपासणी केल्यावर माध्यमांच्या प्रतिनिधीना माहिती दिली, त्यांची प्रकृती ठीक नाही. त्यांचा ब्लड प्रेशर जास्त आहे. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल होण्याची गरज आहे. असे राणेंच्या आरोग्य तपासणी केलेल्या डॉक्टरांनी सांगितले आहे. आता डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्याबाबत पोलीस काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागून राहिले आहे.  

Web Title: Narayan Rane Arrested

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here