तरुणीचे धक्कादायक कृत्य, नवजात अर्भकाला खिडकीतून दिले फेकून
Pune Crime: एका अविवाहित तरुणीने रुग्णांच्या टॉयलेटमध्ये जाऊन एका मुलीला जन्म दिला. त्या नवजात अर्भकाला तिने बाथरूमच्या खिडकीतून बाहेर फेकून दिल्याने अर्भकाचा मृत्यू झाल्याची भीषण घटना.
पुणे: सिंहगड रोडवरील नन्हे येथील एका खासगी रुग्णालयात उपचार घेण्यासाठी आलेल्या एका अविवाहित तरुणीने रुग्णांच्या टॉयलेटमध्ये जाऊन एका मुलीला जन्म दिला. त्या नवजात अर्भकाला तिने बाथरूमच्या खिडकीतून बाहेर फेकून दिल्याने अर्भकाचा मृत्यू झाल्याची भीषण घटना शनिवारी सकाळी साडेदहा वाजता घडली. याप्रकरणी पोलिसांनी गर्ल्स हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या एका १९ वर्षीय तरुणीवर गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी नंदा ढवळे (वय ६२, रा. बाणेर) यांनी सिंहगड रोड पोलिस फिर्याद ठाण्यात दिली आहे. आरोपी तरुणी ही मानाजीनगर येथील हॉस्टेलमध्ये राहते. शारीरिक संबंधातून ती ८ महिन्यांची गर्भवती राहिली होती. तिने ही बाब सर्वांपासून लपवून ठेवली होती. तिच्या पोटात दुखू लागल्याने ती जवळच्या एका हॉस्पिटलमध्ये आली. पाठीचे दुखणे व अशक्तपणा आल्याची तक्रार तिने केली. आपण ८ महिन्यांची गर्भवती असल्याचे तिने लपवून ठेवले. त्यानंतर ती हॉस्पिटलच्या कॅज्युअल्टी वॉर्ड शेजारील रुग्णांच्या टॉयलेटमध्ये गेली. तेथे तिने एका मुलीला जन्म दिला. त्या नुकत्याच जन्मलेल्या अर्भकाला तिने टॉयलेटच्या खिडकीतून बाहेर फेकून दिले. त्यामुळे या अर्भकाचा मृत्यू झाला.
Web Title: Shocking act of a young woman, throwing a Newborn baby
See Latest Marathi News, Ahmednagar News, Education Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App