Home अहमदनगर नगरमधील हृदयदायक घटना:  नातवाचा मृतदेह पाहताच आजोबांनीही सोडला जीव

नगरमधील हृदयदायक घटना:  नातवाचा मृतदेह पाहताच आजोबांनीही सोडला जीव

Shrigonda Accident body of the grandson, the grandfather also gave up his life

अहमदनगर | Shrigonda Accident: श्रीगोंदा येथील चाकण-जामखेड महामार्गावर रस्त्यात उभे असलेल्या उसाच्या ट्रॅक्‍टरला कारची धडक बसल्याने झालेल्या भीषण अपघातात तीन मित्रांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी रात्री एक वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात झालेल्या नातवाचा मृतदेह पाहिल्यानंतर आजोबांनीही जीव सोडल्याची हृद्यदायक घटना घडली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. 

राहुल आळेकर (वय 22),  आकाश खेतमाळीस (वय 19, दोघे रा. श्रीगोंदा) व केशव पांडुरंग सायकर (वय 22, रा. काष्टी) असे या तीन मित्रांचा अपघातात मृत्यू झाला. राहुल व आकाश हे दोघे शनिवारी रात्री मित्र केशवला श्रीगोंद्याहून काष्टीला सोडण्यासाठी मोटारीमधून चालले होते. शहराजवच एक उसाचा ट्रॅक्‍टर ट्रॉली रस्त्यात उभी होती. ट्रॉलीला मोटारीची जोरात धडक बसल्याने हा भीषण अपघात झाला. या प्रकरणी ट्रॅक्‍टर चालकाविरोधात श्रीगोंदा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

या अपघातातील मयत राहुल आळेकर याचे आजोबा (आईचे वडील) जालिंदर शिंदे (वय 63, रा. घारगाव) हे नातवाच्या अंत्यविधीसाठी येथे आले होते. परंतु, नातवाच्या आकस्मिक निधनाचा धक्का सहन न झाल्याने त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. या दोन्ही धक्कादायक घटनेमुळे श्रीगोंदा तालुका परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Web Ttile: Shrigonda Accident body of the grandson, the grandfather also gave up his life

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here