Home क्राईम संगमनेर: पत्नीने पतीसोबत नांदण्यास विरोध केल्याने पती व त्याच्या मित्रांनी केला राडा

संगमनेर: पत्नीने पतीसोबत नांदण्यास विरोध केल्याने पती व त्याच्या मित्रांनी केला राडा

Sangamner Crime News Husband and his friends do Radha as wife opposes 

संगमनेर | Sangamner Crime News:  संगमनेर तालुक्यातील पिंपळगाव कोंझिरा परिसरात धककादायक घटना घडली आहे. पत्नीने पती सोबत नांदावयास जाण्यास विरोध केल्याने पती व त्याच्या मित्रांनी तलवारीचा वापर करत जोरदार राडा केल्याची घटना घडली आहे. शनिवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. यावेळी तरुणांनी  दोन वाहनांचेही नुकसान केले. या प्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात 10 जणांविरुद्ध गुन्हा (Sangamner Crime ) दाखल केला आहे.

याबाबत तालुका पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की,  स्वप्नाली परेश मुळे (रा. धांदरफळ) हिचा व तिच्या पतीचा काही दिवसांपासून वाद सुरू आहे. पती परेश माधव मुळे यांची फारकत केस न्यायालयात सुरू असल्याने ती सुमारे 6  महिन्यांपासून आपल्या भावाकडे पिंपळगाव कोंझिरा येथे राहत आहे. शनिवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास परेश माधव मुळे,  अमेय माधव मुळे, सागर बाजीराव भालेराव, गणेश भास्कर क्षीरसागर, अतुल संजय कोल्हे, सनी सदाफुले, मयुर सदाफुले, विलास वाकचौरे, रवि सोनवणे हे रात्री पिंपळगाव कोंझिरा येथे गेले.

यावेळी स्वप्नाली ही घराच्या अंगणात होती. स्वप्नाली हिने आपणास नांदावयास यायचे नाही, असे यावेळी सांगितले. याचा राग आल्याने परेश याने हातातील तलवार स्वप्नाली हिस मारली. अमेय माधव मुळे, सागर बाजीराव भालेराव, गणेश भास्कर क्षीरसागर, अतुल संजय कोल्हे, सचिन गोपीनाथ म्हस्कुले, सनी सदाफुले, मयुर सदाफुले यांनी अंगणात लावलेली झायलो कार  गाड्यांचे लाकडी दांडक्याने काचा फोडून दरवाजाचे नुकसान केले आहे.

तसेच मोटरसायकल टाकीवर दगड मारून नुकसान केले. यातील काही युवकांनी घरात घुसून घरातील सामानाची तोडफोड करून, घरावर दगडफेक करून घराची कौले फोडून नुकसान केले.

याप्रकरणी विवाहितेचा भाऊ अभिषेक सुनील तांबे याने तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी परेश माधव मुळे, अमेय माधव मुळे, सागर बाजीराव भालेराव, अतुल संजय कोल्हे, सचिन गोपीनाथ म्हस्कुले, विलास किसन वाकचौरे, गणेश भास्कर क्षीरसागर रा. कोठे धांदरफळ, सनी सदाफुले, मयुर सदाफुले, रवि सोनवणे (रा.जामखेड) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस करीत आहे.

Web Title: Sangamner Crime News Husband and his friends do Radha as wife opposes 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here