Home अहमदनगर श्रीगोंदा: पेट्रोलपंप कामगारास खंडणीची मागणी;  दोघांविरुध्द दाखल

श्रीगोंदा: पेट्रोलपंप कामगारास खंडणीची मागणी;  दोघांविरुध्द दाखल

पेट्रोलपंप कामगारास खंडणीची मागणी

श्रीगोंदा तालुक्यातील मांडवगण येथील घटना ;  दोघांविरुध्द दाखल

श्रीगोंदा: तालुक्यातील मांडवगण येथील यशवंत पेट्रोलियम येथे सेल्समनचे काम करणाऱ्या कामगारकडे पाच हजार रुपयांची खंडणी मागत, पेट्रोलियम पैसे मागायचे नाहीत. असे म्हणत त्या कामगारास जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना शनिवारी (दि.२५) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली असुन, या प्रकरणी कामगार गणेश दत्तु जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन दिलीप रामादास वाघ (रा.बनपिप्री ता. श्रीगोंदा) व इतर दोन अनोळखी व्यक्तींविरोध्दात श्रीगोंदा पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

You May Also LikeDeepika Padukone Ranveer Singh Marriage Date

या घटनेबाबत माहिती अशी की, श्रीगोंदा तालुक्यातील मांडवगण येथील सिध्देश्‍वर सर्जेराव देशमुख यांच्या मालकीच्या यशवंत पेट्रोलियमवर शनिवारी दुपारी अडीच वाजता( एम.एच१६व्ही ४५४७) या दुचाकीवरुन  तिघेजण पेट्रोल भरण्यासाठी आले. त्यावेळी पंपावरील कामगार गणेश जाधव यांनी त्या व्यक्तींच्या सांगण्यावरुन त्यांच्या दुचाकीत पाचशे रुपयांचे पेट्रोल टाकले. त्याचे पैसे मागितले असता, या दुचाकीवरील तिघांना आम्ही पेट्रोलचे पैसे देणार नाहीत. आम्ही रोज पेट्रोल भरायला आल्यानंतरदेखील आम्हाला पैसे मागायचे नाहीत व आम्हाला पाच हजार रुपये खंडणी द्यायची. असे म्हणुन पेट्रोल पंपावरील कामगार जाधव यांनी शिवीगाळ करुन पेट्रोलचे पैसे मागितले तर तुला जिवंत ठेवणार नाही, असा दम दिला. त्यावर जाधव यांनी तातडीने आवाज देत पंपावरील कामगार व पेट्रोलपंप मालक यांना बोलावुन घेतले या सर्वांनी या दुचाकीवरील तिघांना पकडण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यापैकी दोघेजण पळुन गेले मात्र एकाला पकडले त्याचे नावगाव विचारले असता. त्याने दिलीप रामदास वाघ (रा.बनपिप्री वा. श्रीगोंदा) असे सांगितले त्यानंतर या व्यक्तीला पकडुन त्याच्या दुचाकीसह श्रीगोंदा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन दिलीप रामदास वाघ व अन्य दोन अनोळखी व्यक्तीविरोध्दात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असुन, पुढील तपास सहायक फौजदार अनिल भारती हे करीत आहेत.


मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा


आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. रहा अपडेट दररोज. धन्यवाद.  मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा.


ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा. आपल्याला ही बातमी आवडल्यास फेसबुक वर जरूर शेअर करा धन्यवाद.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here