Home महाराष्ट्र श्रीक्षेत्र भगवानगडाचे नाव देशपातळीवर झळकवण्याचे कार्य स्व.लोकनेते मुंडे साहेबांनी केले – आमदार...

श्रीक्षेत्र भगवानगडाचे नाव देशपातळीवर झळकवण्याचे कार्य स्व.लोकनेते मुंडे साहेबांनी केले – आमदार राजळे

श्रीक्षेत्र भगवानगडाचे नाव देशपातळीवर झळकवण्याचे कार्य स्व.लोकनेते मुंडे साहेबांनी केले – आमदार राजळे

खरवंडी कासार प्रतिनिधी -क्षेत्र भगवानगडाचे नाव देश पातळीवर झळकवण्याचे कार्य स्व.लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेबांनी केले पाथर्डी शेवगाव तालुक्यावर साहेबांनी आणि पंकजाताईंनी भरभरून दिलेल्या प्रेमाने मदतीची हाक दिल्यास जनता धाऊन येते असे प्रतिपादन पाथर्डी,शेवगाव तालुक्याच्या आमदार मोनिकाताई राजळे यांनी केले त्या पाथर्डी तालुक्यातील खरवंडी कासार येथे अखंड हरिनाम सप्ताह सांगता सदिच्छा भेट प्रसंगी बोलत होत्या.

You May Also LikeDeepika Padukone Ranveer Singh Marriage Date

आमदार राजळे म्हणाल्या की ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली जलयुक्त शिवार, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतुन रस्ते या साठी भरघोस निधी तालुक्यासाठी उपलब्ध झाला विकास कामे पुर्णत्वास जात आहेत आपला तालुका ऊसतोडणी कामगारांचा तालुका म्हणुन असलेली ओळख पुसुन टाकण्यासाठी आपली वाटचाल सुुरू आहे आपला तालुका संत, महतांच्या विविधतेने नटलेला  कायम संघर्षाचा तालुका म्हणुन ओळख संघर्ष करत असताना संत,महंत यांच्या आशिर्वादाने आणि पंकजाताई यांच्या माध्यमातुन तालुक्याचा विकास होत आहे तालुक्यातील जनता पाण्यासाठी विस्थापित होत होती पाणी प्रश्न मिटला पाहीजे यासाठी  भगवानगड ३५ गावाची पाणी पुरवठा योजना यासाठी ९२ कोटी मंजुर केले असुन महिलांच्या डोक्यावरील हंडा खाली येण्यास मदत होईल. संत जनार्धन स्वामी सभामंडपासाठी १५ लाख वर्ग केले असुन येणारा सप्ताह नविन वास्तु मध्ये होईल अशी ग्वाही दिली. ग्रामस्थांनी मतभेद बाजुला ठेवून सप्ताह निमित्त एकत्र आलात याचा आनंद आहे. सप्ताहाच्या माध्यमातुन परमार्थाचा आनंद मिळतो संत जिवनात परिवर्तन घडवण्याचे कार्य करतात आध्यात्माची आजच्या काळात मोठी गरज आहे .श्रीक्षेत्रभगवान गडाचे महंत डॉ.नामदेव शास्त्री यांचे खरवंडी कासार येथे आगमन होताच फटाके वाजुन भव्य मिरवणुक काढत ग्रामस्थांनी भव्य स्वागत केले. ग्रामस्थांच्या वतीने महंताचा सत्कार युवा वर्गानेे केला.

महंत डॉ.नामदेव शास्त्री म्हणाले की संत भगवान बाबा,संत जनार्धन स्वामी यांना मि प्रार्थणा करतो  की भरपुर पाऊस पडू द्या म्हणजे हा परिसर समाधानी होईल. सिध्देश्वर संस्थान शिरूर कासारचे महंत हभप विवेकानंद शास्त्री यांच्या अमृततुल्य किर्तनाने सप्ताहाची सांगता झाली. महाप्रसाद पंगत रावसाहेब बाबुराव राऊत यांच्या वतीने देण्यात आली. सप्ताह यशस्वी होण्यासाठी सप्ताह कमीटी, ग्रामस्थांनी प्रयत्न केले.

मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा


आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. रहा अपडेट दररोज. धन्यवाद.  मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा.


ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा. आपल्याला ही बातमी आवडल्यास फेसबुक वर जरूर शेअर करा धन्यवाद.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here