Home अकोले अकोले: तालुकास्तरीय कबड्डी संघांचे सुयश.

अकोले: तालुकास्तरीय कबड्डी संघांचे सुयश.

अकोले: तालुकास्तरीय कबड्डी संघांचे सुयश.

अकोले: महाराष्ट्र हि संत, पंत, महंतांची भूमी आहे. अशा भुमित विविध सण, उत्सव साजरे केले जातात. त्याचबरोबर विविध खेळ देखील खेळले जातात. इतकेच नव्हे तर विद्यार्थ्यांच्या बौद्धीक वाढीबरोबरच शारीरीक विकास देखील तितकाच महत्वाचा मानला जातो. याच उद्देशाने तालुकास्तरीय क्रिडा स्पर्धांचे आयोजन केले होते.
नुकत्याच तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा अकोले येथे पार पडल्या.
या कबड्डी संघांच्या मुलांमध्ये १४ वर्ष वयोगटात अगस्ती विद्यालय अकोले या संघाची निवड झाली तसेच १७ वर्ष वयोगटात रयत शिक्षण संस्थेचे कोतुळेश्वर विद्यालय कोतुळ तर १९ वर्ष वयोगटात अगस्ती कला, वाणिज्य व दादासाहेब रूपवते विज्ञान महाविदयालय अकोले या संघाची निवड झाली असून या वयोगटात महालक्ष्मी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पिंपळगाव नाकविंदा हा संघ उपविजेता ठरला.
त्याचप्रमाणे मुलींमध्ये १४ वर्ष वयोगटात कन्या विद्यालय अकोले या संघाची निवड झाली आहे. तसेच १७ वर्ष व १९ वर्ष वयोगटात अगस्ती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय समशेरपुर या संघाची निवड झाली असुन महालक्ष्मी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पिंपळगाव नाकविंदा हा संघ उपविजेता ठरला आहे.तालुकास्तरीय प्रथम आलेल्या सर्व वयोगटातील संघांची जिल्हास्तरावर निवड झाली आहे.
या यशस्वी संघांना क्रिडा शिक्षक प्रा.सुरेश वाकचौरे,प्रा. जयराम तळपाडे,प्रा.नंदलाल कालन,प्रा. योगेश उगले, भागवत देशमुख,भिमाजी लोहकरे, विजय उगले,सौ. आंबरे,जी.के. धुमाळ, आर.के. बेणके, एस.ए. गोडे यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.
या कबड्डी स्पर्धांत सोपान लांडे, अनिल चासकर, रामदास कासार, संपत धुमाळ, विनोद तारू, सुरेश वाकचौरे, सचिन लगड,श्री. गेलवडे आदींनी पंच म्हणून काम पाहिले.
या यशाबद्दल अकोले क्रिडा संघटनेचे अध्यक्ष संपत नाईकवाडी, सचिव शिवाजी चौधरी, राज्यपंच अनिल चासकर, सोपान लांडे तसेच सर्व क्रिडा शिक्षक, प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद आदींनी अभिनंदन केले.

मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा


आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. रहा अपडेट दररोज. धन्यवाद.  मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा.


ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा. आपल्याला ही बातमी आवडल्यास फेसबुक वर जरूर शेअर करा धन्यवाद.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here