संगमनेर: विहीरीत आढळुन अल्पवयीन मुलीचा मृतदेह
विहीरीत आढळुन अल्पवयीन मुलीचा मृतदेह
तळेगाव दिघे: संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे (जुनेगाव) येथील गावानजीक असणाऱ्या ५० फुट खोल विहीरीत एका अल्पवयीन मुलीच्या मृतदेह आढळला. सुजाता लहानु दिघे (वय १५ ) असे या दुर्दैवी मुलीचे नाव आहे. शनिवारी साडेसात वाजताच्या सुमारास ही घटना उघडीस आली. याप्रकरणी संगमनेर तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली.
संगमनेर तालुक्यातील दिघे गावालगत उत्तरेला असणाऱ्या ५० फुट खोल विहीरीत मृतदेह असल्याचे नजीकच्या रहिवाश्यांना आढळुन आले. त्यांनी ग्रामस्थांना व पोलीसांना ही माहिती दिली. विहीरीची अत्यंत दुर्दशा झालेली असल्याने मृतदेह बाहेर काढण्यात अडचण निर्माण झाली होती. पोलिस व ग्रामस्थांनी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास मृतदेह विहीरीतुन बाहेर काढला.
You May Also Like: Deepika Padukone Ranveer Singh Marriage Date
सुजाता लहानु दिघे (वय १५ ) असे या मुलीचे नाव असल्याचे उघड झाले. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला. त्यांनतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी संगमनेर ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला. ग्रामीण रुग्णालयात वैद्यकिय अधिकाऱ्यांनी पोलिसांत खबर दिली. याप्रकरणी सीआरपीसी १४७ प्रमाणे संगमनेर तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोद करण्यातआली आहे.
पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शना खाली तळेगाव पोलीस दुररक्षेत्राचे सहायक फौजदार दत्तात्रय पानसरे, मुख्य हवालदार लक्ष्मण औटी वालदार बाबा खेडकर अधिक तपास करीत आहेत.
मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा
आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. रहा अपडेट दररोज. धन्यवाद. मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा.
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा. आपल्याला ही बातमी आवडल्यास फेसबुक वर जरूर शेअर करा धन्यवाद.