Home अहमदनगर चोरट्यांनी सोनाराचे दुकान फोडले, दीड लाखांचा मुद्देमाल चोरीस

चोरट्यांनी सोनाराचे दुकान फोडले, दीड लाखांचा मुद्देमाल चोरीस

Shrigonda Thieves broke into a goldsmith's shop

श्रीगोंदा | Shrigonda: श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठण येथे एका सोनाराचे दुकान फोडून दीड लाखांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी बेलवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. जिल्ह्यामध्ये चोरट्यांचा सूळसुळाट सुटला आहे. या चोरट्यांना पकडण्यात पोलिसांना अपयश येत असल्याचे दिसून येत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील देवदैठण गावात रेणुका ज्वेलर्सचे दुकान आहे. चोरट्यांनी या दुकानाचे शटर उचकटून आत प्रवेश करत काऊटरमधील सोने चांदीचे दागिने लंपास केले.

याप्रकरणी पंकज किसन डहाळे यांनी बेलवंडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक अरविंद माने यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. या घटनेचा अधिक तपास कॉन्स्टेबल शेलार हे करीत आहेत.   

Web Title: Shrigonda Thieves broke into a goldsmith’s shop

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here