Home अहमदनगर Rekha Jare Murder Case: बाळ बोठे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

Rekha Jare Murder Case: बाळ बोठे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

 Rekha Jare murder case Bal Bothe's pre-arrest bail application was rejected

Rekha Jare Murder Case: रेखा जरे खून प्रकरणातील मुख्य आरोपी बाळ बोठे यांचा जामीन अर्ज अहमदनगर न्यायालयाने फेटाळून लावला आहे. यामुळे बोठेंच्या अडचणीत आणखीनच वाढ झाली आहे.

या गुन्ह्यात नाव आल्यापासून मुख्य आरोपी बाळ बोठे हा फरार झालेला आहे. अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी अर्ज दाखल केला होता. पोलिसांनी बोठे याला समक्ष हजर राहण्याचा आदेश देण्याची मागणी केली होती. ही मागणी सुद्धा कोर्टाने फेटाळून लावली होती. त्यांनतर आज अटकपूर्व जामिनावर सुनावणी झाली. वकील महेश नवले हे आरोपीतर्फे युक्तिवाद करत आहे.

सरकारकडून जिल्हा सरकारी वकील सतीश पाटील हे बाजू मांडत आहे. पोलिसांकडे भक्कम पुरावे असल्याचे सरकारी वकिलांनी कोर्टाला सांगितले होते. जिल्हा व सत्र न्यायाधीश एम.आर. नातू यांनी बोठेंचा अटकपूर्व जामीन फेटाळून लावला आहे.

बोठे  अजून फरारच आहेत. त्यांचा शोध सुरु आहे. पोलिसांना गुंगारा देणारा बोठे यांच्या अडचणीत आता वाढ झाली आहे.

Web Title: Rekha Jare murder case Bal Bothe’s pre-arrest bail application was rejected

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here