प्रियकराच्या फसवणूक त्रासाला कंटाळून तरुणीची आत्महत्या
श्रीगोंदा(Shrigonda): श्रीगोंदा येथील रुग्णालय परिसरात शासकीय वसाहतीमधील २० वर्षीय तरुणीने घरात पंख्याला गळफास घेवून आत्महत्या करण्याचा शुक्रवारी प्रयत्न केला. शनिवारी उपचार सुरु असताना तिचा मृत्यू झाला. प्रियकराच्या फसवणुकीने व दमबाजीला कंटाळून तिने आत्महत्या केली.
ही तरुणी अकलूज जि. सोलापूर येथील मूळ रहिवासी होती. ती श्रीगोंदा येथील तिच्या अत्याकडे राहत होती. तिचे ग्रामीण रुग्णालयाच्या वसाहतीत वास्तव्य होते. प्रियकर धनंजय हा जामखेड तालुक्यातील जवळा येथील जिल्हा बँक शाखेत कॅशीयर होता. या तरुणीची व धनंजयचे सोशियल मेडीयातून प्रेमसंबंध जुळले. त्याने अविवाहित असल्याचे सांगून तरुणीला आपल्या जाळ्यात अडकविले. तिला भेटण्यासाठी तो सुट्टीच्या दिवशी त्याचा मित्र विजय कांबळे यांच्याकडे जात होता. विजय कांबळे हा तेथेच वसाहतीत वास्तव्य करीत होता. विजय कांबळे याच्या खोलीत धनंजयने तरुणीशी शारीरिक संबंध ठेवले. मात्र धनंजयने मी विवाहित असल्याचे सांगून लग्न करू शकणार नाही असे त्या तरुणीला सांगण्यात आले. तरुणीला व तिच्या आत्यालाही दमबाजी करत होते.
याप्रकरणी प्रसाद यांच्या फिर्यादीवरून प्रियकर धनंजय विष्णुपंत कांबळे, विजय कांबळे व अन्य एका विरोधात श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाचकहो, ‘संगमनेर अकोले न्यूज’ ला व्हाटस अप वर फॉलो करताय ना?… अजून जॉईन केले नसेल तर क्लिक करा -(Sangamner Akole News) आणि मिळवा ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलवर.
Website Title: Shrigonda woman commits suicide after being cheated, lover