Home श्रीगोंदा सीसीटीव्ही फुटेजच्या सहायाने महिलेचा खुन करणारा अटकेत

सीसीटीव्ही फुटेजच्या सहायाने महिलेचा खुन करणारा अटकेत

Shrigonda Woman's killer arrested with CCTV footage

श्रीगोंदा | Shrigonda: श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर येथील गुरुवारी दिनांक ३ रोजी मनोरुग्ण महिलेची हत्या करण्यात आली होती. या मनोरुग्ण महिलेचा मारेकरी गुन्हे शाखा बेलवंडी पोलिसांनी  सीसीटीव्ही फुटेजच्या सहायाने पकडण्यात आला आहे.

लता मधुकर शिंदे वय ५४ रा. विसापूर ता. श्रीगोंदा या मनोरुग्ण महिलेचा खून करण्यात आला होता. बेलवंडी पोलीस व गुन्हे अन्वेषण विभाग पथकाने तीन दिवस रात्रंदिवस तपास केला आहे. विसापूर येथील दुकानांसमोरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले आहेत. यामध्ये एका परप्रांतीय आरोपीला अटक करण्यात आली आहे.

मुकेश मोतीलाल गुप्तता वय २८ मुळचा उत्तरप्रदेश, सध्या रहिवासी बेलवंडी असे या अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. या महिलेची हत्या करण्यामागचे कोणतेही कारण नसताना हत्या करण्यात आली.

जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाची चक्रे फिरविण्यात आली.

बेलवंडीचे पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या पथकाने कारवाई करून गुन्ह्याचा शोध लावला आहे. या पथकाने विसापूर शहरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता या महिलेच्या पाठीमागे गुरुवारी रात्री जात असताना ती व्यक्ती दिसून आल्याने पोलिसांनी त्यास अटक केली आहे. आरोपीने गुन्हा कबुल केला आहे. मात्र हत्या मागचे कारण अद्याप समोर आले नाही.  

Web Title: Shrigonda Woman’s killer arrested with CCTV footage

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here