Home अकोले अकोलेते चोरट्यांनी मोबाईल शॉपी फोडली, लाखोंचा मुद्देमाल लंपास

अकोलेते चोरट्यांनी मोबाईल शॉपी फोडली, लाखोंचा मुद्देमाल लंपास

Akole Taluka Star Mobile Shoppe theft 

अकोले: अकोले शहरात हॉटेल जय महाराष्ट्रच्या पाठीमागे असलेले मातोश्री कॉम्प्लेक्समध्ये असलेले स्टार मोबाईल शॉपीचे शटर उचकटून चोरी केल्याची घटना बुधवारी मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास घडली. यात तीन ते चार लाख रुपयांचे मोबाईल चोरून नेण्यात आले आहे.

शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या हॉटेल जय महाराष्ट्रच्या पाठीमागे समीर सय्यद यांचे स्टार मोबाईल शॉपी दुकान आहे. चोरट्यांनी बुधवारी मध्यरात्री शटरचे लॉक तोडून दुकानात प्रवेश केला. दुकानातील वस्तूंची तोडफोड करण्यात आली. दुकानातील ३ ते ४ लाखांचे मोबाईल भरून चोरट्यांनी पोबारा केला.

गुरुवारी सकाळी मातोश्री कॉम्प्लेक्सचे मालक दत्ता धुमाळ घराबाहेर आले असता त्यांना दुकानाचे शटर तुटलेल्या अवस्थेत आढळून आले. त्यांनी लगेचच ही माहिती दुकान मालक समीर सय्यद यांना फोन वरून दिली.

सय्यद यांनी प्रत्यक्ष प्रकार पाहून अकोले पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. अकोले तालुक्याचे पोलीस निरीक्षक अभय पारमार यांनी घटनास्थळी भेट दिली.

सदर चोरीचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. त्यानुसार या चोरीत प्रथमदर्शनी ३ चोरटे असल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे सदर अज्ञात चोरट्यांनी पीपीई कीटसारखा पोशाख परिधान केलेला होता. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास अकोले पोलीस करीत आहे.

Web Title: Akole Taluka Star Mobile Shoppe theft 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here