Home क्राईम निंदनीय! सहा वर्षांच्या चिमुकलीवर वृद्धाने केला अत्याचार

निंदनीय! सहा वर्षांच्या चिमुकलीवर वृद्धाने केला अत्याचार

सहा वर्षीय बालिकेला चॉकलेट देण्याचे आमिष दाखवून ६० वर्षीय वृद्धाने अत्याचार (abused) केल्याची निंदनीय घटना.

the six-year-old child was abused by an old man

अंबाजोगाई | बीड: तालुक्यातील एका गावात सहा वर्षीय बालिकेला चॉकलेट देण्याचे आमिष दाखवून ६० वर्षीय वृद्धाने अत्याचार केल्याची निंदनीय घटना समोर आली आहे. याप्रकरणी बर्दापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, त्या वृद्धाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

पीडित अल्पवयीन बालिका सध्या अंबाजोगाई येथील एका शाळेत पहिलीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. तिच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, गुरुवारी शाळेतून गावाकडे घरी आल्यानंतर ती खेळण्यासाठी गेली. त्यानंतर रात्री ती कोणासही काहीही न बोलता एकटीच शांत बसली. त्यामुळे आई-वडिलांनी तिला विचारले असता पोट दुखत असल्याचे तिने सांगितले. दुसऱ्या दिवशी शाळेतून आल्यानंतरही तिचे पोट दुखत होते. त्यामुळे वडिलांनी तिला विश्वासात घेऊन विचारले असता तिने विष्णू बाबूराव सादुळे याने चॉकलेट देतो, असे आमिष दाखवून जुन्या घरात अत्याचार केला. त्यानंतर विष्णू सादुळे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

Web Title: the six-year-old child was abused by an old man

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here