Home क्राईम अब्जाधीशाची पत्नी ‘ब्लॅकमेल’, पत्नीसोबत शारीरिक संबंध, दोन कोटींची मागणी

अब्जाधीशाची पत्नी ‘ब्लॅकमेल’, पत्नीसोबत शारीरिक संबंध, दोन कोटींची मागणी

Crime News: मित्राने गुंगीचे औषध देत मुंबईच्या अब्जाधीशाच्या पत्नीसोबत शारीरिक संबंध ठेवले. पुढे याच व्हिडीओच्या आधारे ब्लॅकमेल करत पैसे उकळण्यास सुरुवात.

Billionaire's wife blackmailed physical relationship with wife

मुंबई : माझे तुझ्यावर प्रेम आहे म्हणत मित्राने गुंगीचे औषध देत मुंबईच्या अब्जाधीशाच्या पत्नीसोबत शारीरिक संबंध ठेवले. पुढे याच व्हिडीओच्या आधारे ब्लॅकमेल करत पैसे उकळण्यास सुरुवात झाली. भोपाळ ते मुंबई दरम्यान तीन कोटी उकळून झाल्यानंतर मुंबईत कार अडवून फायनल सेटलमेंटच्या नावाखाली आणखीन दोन कोटींची मागणी करताच महिलेने पोलिसांत धाव घेतली. अखेर, एमआयडीसी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीसह मोनिका मिश्राविरोधात खंडणीचा गुन्हा नोंदवत तपास सुरू केला आहे.

मूळची भोपाळची रहिवासी असलेल्या ३८ वर्षीय महिला जोगेश्वरीतील बड्या इमारतीत राहण्यास आहे. त्यांचे पती हजारों कोटींची उलाढाल असलेल्या एका रिफायनरी कंपनीचे प्रमुख आहेत. महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, २०२१ मध्ये कामानिमित्त भोपाळ  येथे  असताना धर्मेंद्र मिश्रासोबत ओळख झाली. मिश्राचे पत्नीसोबत घरी येणे- जाणे सुरू झाले. यातूनच धर्मेंद्रने प्रेमासाठी गळ घातली. महिलेने नकार दिला. मात्र, माफी मागून संवाद पुन्हा कायम ठेवण्याच्या नावाखाली जवळीक साधली. दि. २५ एप्रिल रोजी त्याने, ज्यूसमधून गुंगीचे औषध देत अत्याचार केल्याचे नमूद केले. याबाबत तक्रार दिल्यास मुलांचे अपहरण करून जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यामुळे तक्रार केली नसल्याचे तक्रारीत म्हटले आहे. मे २०२१ मध्ये मुंबईला परतल्यानंतर त्याने ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. मोनिकाचे वडील आणि भावाकडूनही धमकी देऊन पैसे वसूल केले होते. स्वतःसह पतीची प्रतिष्ठा जपण्यासाठी त्यांनी, गेल्या वर्षापर्यंत तीन कोटी उकळले होते. याच भीतीचा फायदा घेत वेळोवेळी मुंबई, भोपाळ येथे अत्याचार केले. अनेकदा गळा दाबून मारहाणही केल्याचेही तक्रारीत नमूद केले आहे.

Web Title: Billionaire’s wife blackmailed physical relationship with wife

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here