Home संगमनेर संगमनेर तालुक्यात अवकाळी पावसाची हजेरी; गारांचा पाउस

संगमनेर तालुक्यात अवकाळी पावसाची हजेरी; गारांचा पाउस

Sangamner Rain: दरम्यान साकुर परिसरात अवकाळी पावसाने हजेरी लावली. बिरेवाडी शिवारात तुरळक गारांचा पाऊस.

Unseasonal rains in Sangamner taluka Hail

संगमनेर: संगमनेर तालुक्यात साकुर परिसरात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी मेटाकुटिला आला आहे.  गेल्या दोन दिवसांत संगमनेर तालुक्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. मोठा उष्माही जाणवत होता. रविवारी रात्री (दि.५) आठ वाजेच्या दरम्यान साकुर परिसरात अवकाळी पावसाने हजेरी लावली. बिरेवाडी शिवारात तुरळक गारांचा पाऊस पडला. वीजप्रवाह खंडित झाला होता.

सध्या शेतात गहू, हरभरा, कांदा आदी मुख्य पिके आहेत. काही शेतकऱ्यांच्या शेतात गहू, कांदे काढण्याचे काम सुरू आहे. रविवारी पंधरा ते वीस मिनिटे अचानक झालेल्या अवकाळी पावसाने गहू, कांदे झाकण्यासाठी शेतकऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली. सध्या शेतमालाला बाजारभाव नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत आहेत. खर्चही फिटत नसल्याने सर्वसामान्य शेतकरी अक्षरशः मेटाकुटीला आले आहेत. संगमनेर तालुक्यातील बिरेवाडी येथे रविवारी रात्री पडलेल्या गारा. कीर्तन सुरू होते. अचानक अशातच अवकाळी पावसाचे संकट पावसाने हजेरी लावल्याने ओढवल्याने शेतकरी चिंतेत आहेत. एकच धांदल उडाली. बिरेवाडी येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे थांबविण्यात आले.

यंदाच्या हंगामात थंडी चांगल्याप्रकारे राहिल्याने जिल्ह्यात उन्हाळी कांद्याचे पीक अगदी जोमात आहे. काही शेतकऱ्यांची कांद्याची काढणीही सुरु आहे. आता अचानक आलेल्या गारपीट व अवकाळी पावसाने कांद्याचेही नुकसान होण्याची शक्यता आहे.

Web Title: Unseasonal rains in Sangamner taluka Hail

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here