Home Accident News वारकऱ्यांच्या दिंडीच्या ट्रॅक्टरचा भीषण अपघात, पाच जण ठार, ३५ जखमी

वारकऱ्यांच्या दिंडीच्या ट्रॅक्टरचा भीषण अपघात, पाच जण ठार, ३५ जखमी

Solapur News Five killed in Warkari tractor accident

Solapur News : सोलापूरमध्ये वारकऱ्यांच्या दिंडीच्या ट्रॅक्टरला मालट्रकने मागून धडक दिल्यामुळे भीषण अपघात (Accident) झाला. या अपघातात जवळपास 35 ते 40 जण जखमी झाले असून पाच जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहेत. सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील कोंडी जवळ हा अपघात (Accident) झाला आहे.  या  अपघातातील सर्व वारकरी तुळजापूर तालुक्यातील कदमवाडी गावचे रहिवासी आहेत. 

एकादशीनिमित्त हे सर्वजण पांडुरंगाच्या दर्शनासाठी रात्री ट्रॅक्टर ट्रालीत बसून पंढरपूरला निघाले होते. याबाबत अधिक माहिती अशी, सोलापूर-पुणे महामार्गावर शहराला खेटून असलेल्या कोंडी गावच्या शिवारात रस्त्याच्या कडेला असलेल्या पहिल्या मार्गिकेवर ट्रॅक्टर ट्रालीला पाठीमागून एका मालमोटारीची (एमएच १२ टीव्ही ७३४८) जोरात धडक बसली. भरधाव वेगातील मालमोटारीच्या पुढील डाव्या बाजूच्या चाकाचे टायर फुटल्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटले आणि मालमोटार भाविकांच्या ट्रक्टर ट्रालीवर जोरात आदळला. या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. जखमींना शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या अपघाताची माहिती मिळताच सोलापूर ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी शासकीय रूग्णालयाकडे धाव घेतली.

Web Title: Solapur News Five killed in Warkari tractor accident

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here