Home महाराष्ट्र प्रियकराच्या मदतीने पत्नीने पतीला नदीपात्रात बुडवून मारले ठार

प्रियकराच्या मदतीने पत्नीने पतीला नदीपात्रात बुडवून मारले ठार

boyfriend, the wife drowned her husband in a river basin and murder

चंद्रपूर: अनैतिक संबधातून पत्नीने पतीच्या हत्येसाठी १५ हजारांची सुपारी देऊन ठार (Murder) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर शहरातील एका सामान्य वाटणाऱ्या घटनेतून समोर आला आहे. कट रचून प्रियकराच्या मदतीने पत्नीने सुपारी किलरच्या सहाय्याने पतीला नदीपात्रात बुडवून ठार केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर पोलीस ठाणे हद्दीतील वर्धा नदीच्या पात्रात ही घटना घडली आहे. आधी सुमन निषाद हिच्या प्रियकराने पती रामेश्वर निषाद (38) याला ढाब्यावर दारू पाजली. परत येताना वर्धा नदी पुलाला कठडे नसल्याने दुचाकी चालविताना मद्यपी पती कोसळल्याचा बनाव करण्यात आला. त्याच्यासोबत असलेल्या सुरज सोनकर या प्रियकरानेच पोलीस तक्रार केली. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे घटना व त्याआधीचे धाब्यावरील जेवण यातील कालावधी अधिक वाटल्याने मोबाईल CDR ची पडताळणी केल्यावर पोलिसांचा अंदाज खरा ठरला.

पोलिसांनी अनैतिक संबधातून हत्या (murder) केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपीस अटक करण्यात आली आहे. यवतमाळचा सुपारी किलर अभिजीत पांडे याला सुमन निषाद हीने पतीच्या हत्येसाठी १५  हजारांची सुपारी दिली होती यामुळे पोलिसांनी पांडेलाही अटक (arrest) केली आहे.

Web Title: boyfriend, the wife drowned her husband in a river basin and murder

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here