Home Uncategorized बारावीचा पेपर फुटला, शिक्षकास अटक

बारावीचा पेपर फुटला, शिक्षकास अटक

HSC Exam Paper Leak teacher arrested

HSC Exam Paper Leak :  राज्यात पेपरफुटीचे सत्र सुरूच आहे.  बारावी बोर्डाचा केमिस्ट्रीचा पेपर फुटला असल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे.  या प्रकरणी विलेपार्ले पोलिसांनी मालाड येथील एका खासगी कोचिंग क्लासेसच्या शिक्षकाला अटक केली आहे. या शिक्षकाने  बारावी केमिस्ट्रीचा पेपर आपल्या विद्यार्थ्यांना दिल्याची माहिती समोर आली आहे.

शनिवारी बारावीचा केमिस्ट्रीचा पेपर झाला होता. मात्र, परीक्षेआधीच हा पेपर विद्यार्थ्यांच्या मोबाइलवर निदर्शनात आला. याप्रकरणी मालाडमधील खाजगी क्लासेसच्या शिक्षकाला या प्रकरणी विलेपार्ले पोलिसांनी अटक केली. मुकेश यादव असं या खाजगी क्लासेस चालवणाऱ्या शिक्षकाचे नाव आहे. या खाजगी शिक्षकाने आपल्या वर्गात शिकत असलेल्या तीन विद्यार्थ्यांना व्हाट्स अॅपवर हा पेपर सुरू होण्याआधीच दिला असल्याची माहिती मिळाली आहे.

या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का? या आधीचेदेखील पेपर फुटले का? यामागे नेमकी कोणाचा हात आहे किंवा आर्थिक व्यवहार झाला का  याबाबत पोलीस सखोल चौकशी करत आहेत.

Web Title: HSC Exam Paper Leak teacher arrested

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here