Home Uncategorized अल्पवयीन मुलावर अत्याचार; महिलेसह चौघांविरुद्ध गुन्हा

अल्पवयीन मुलावर अत्याचार; महिलेसह चौघांविरुद्ध गुन्हा

Jalgaon Crime News :  मुलास दारू पाजून त्याच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करून त्याचा व्हिडिओ काढून तो व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत खंडणी वसूल करणाऱ्या महिलेसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल.

Abuse of a minor Crime against four including woman

जळगाव: अल्पवयीन मुलास दारू पाजून त्याच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करून त्याचा व्हिडिओ काढून तो व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत खंडणी वसूल करणाऱ्या महिलेसह चौघांविरुद्ध पाचोरा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी (ता. २) उघडकीस आली आहे.

पाचोरा तालुक्यातील एका मोठ्या गावातील या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, कोरोना लॉकडाउनच्या काळात आपल्या परिवारासह तालुक्यातील आपल्या मूळ गावी आलेल्या अल्पवयीन मुलाच्या मित्राच्या नात्यात असलेल्या महिलेने अल्पवयीन मुलास दारू पाजून बळजबरीने शारीरिक संबंध करण्यास भाग पाडले. त्याचा व्हिडिओ तयार केला. पन्नास हजार रुपये आणून दे, अन्यथा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. मुलाने घाबरून जाऊन घरातील पैसे व दागिने या महिलेला आणून दिले; परंतु पुन्हा तशीच मागणी दोन वेळा झाल्याने मुलाने झालेला प्रकार आपल्या वडिलांना सांगितला.

त्यांनी संबंधित महिलेस जाब विचारला असता त्यांनाही शिवीगाळ व मारहाण करण्यात आली. त्यामुळे पीडित मुलाच्या पालकांनी पाचोरा पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी महिलेसह चार जणांवर शनिवारी (ता. २) गुन्हा दाखल केला आहे. उपनिरीक्षक योगेश गणगे अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Abuse of a minor Crime against four including a woman

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here