Home अहमदनगर नगर जिल्ह्यात बारावीचा गणिताचा पेपर फुटला

नगर जिल्ह्यात बारावीचा गणिताचा पेपर फुटला

HSC Mathematics paper leak of class XII was torn in Nagar district

श्रीगोंदा | Shrigonda: अहमदनगर जिल्ह्यात  बारावी बोर्डाचा गणित विषयाचा पेपर फुटल्याची (HSC Mathematics paper leak) धक्कादायक बातमी समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

श्रीगोंद्यातील विद्यार्थ्यांना पेपर सुरू होण्यापूर्वी सुमारे पाऊण तास उत्तरासहित प्रश्नपत्रिका यांच्या मोबाईलच्या व्हाट्सअप वर आल्याने एकच खळबळ उडाली.

राज्यात १२वी च्या विद्यार्थ्यांची परीक्षा सुरू आहे. आज गणित (Mathematics) या विषयाचा पेपर होता. परंतू हा पेपर फुटला आणि 10 वाजताच उत्तर पत्रकेसह सोशल मीडियावर व्हायरल झाला असल्याची  माहिती समोर आली आहे. पेपर अहमदनगर जिल्ह्यात नक्की कोणत्या केंद्रातून फुटला याबाबत तपास करण्यासाठी शिक्षणाधिकारी श्रीगोंदयात दाखल झाले आहेत. शनिवारी केमिस्ट्री विषयाचा पेपर फुटला होता त्यानंतर आज धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Web Title: HSC Mathematics paper leak of class XII was torn in Nagar district

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here