Home अहमदनगर Accident: डंपरच्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू

Accident: डंपरच्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू

Rahata Accident Woman dies on the spot after being hit by a dumper

Ahmednagar | राहाता | Rahata: डंपर ने दिलेल्या धडकेत झालेल्या अपघातात (Accident) एक महिला जागीच ठार झाल्याची घटना राहाता पोलीस ठाण्याच्या हद्दीत काकडी (ता. कोपरगाव) येथे काल घडली.

या अपघातात सुलोचना दत्तू शिरसाठ (वय 45) ही महिला मृत झाली. सदरची महिला काकडी संगमनेर रोड च्या एटीसी टॉवर जवळ असताने तीला टाटा कंपनीच्या एमएच 17 बी. वाय. 7216 या डंपरने जोराची धडक दिली. महिला गंभीर जखमी झाल्याने जागेवरच मयत झाली. तिच्या जवळ आढळल्याला आधारकार्डने तिचे नाव समजले.

राहाता पोलीस ठाण्याचे काकडी विमानतळ येथे ड्युटीवर असलेले पोलीस कॉन्स्टेबल वाल्मिक मच्छिंद्र बढे यांनी खबर दिली. दिलेल्या खबरीवरून राहाता पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू रजि. नंबर 15/2022 सीआरपीसी 174 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघातातील  डंपर चालक रस्त्याच्याकडेला डंपर लाऊन पसार झाला आहे.

Web Title: Rahata Accident Woman dies on the spot after being hit by a dumper

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here